शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

गावोगावी ध्वजवंदन उत्साहात

By admin | Updated: January 28, 2017 00:19 IST

लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गवळीवाडा येथे काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक महम्मद मणियार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने रमेश नय्यर यांच्या निवासस्थानी नगरसेविका अंजना कडू व शहराध्यक्ष राजु बोराटी यांच्या हस्ते तर भाजपाच्या वतीने नांगरगाव येथील मगनलाल चिक्की कारखान्यांच्या आवारात काकी आगरवाल, शहराध्यक्ष बाबा शेट्टी, भरत हारपुडे, अशोक आगरवाल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व स. निरीक्षक संदीप येडे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.श्रीराम क्रीडा मंडळ गवळीवाडा व डायनॅमिक रेमिडीज् यांच्या वतीने नगर परिषदेच्या गवळीवाडा शाळेत मोफत ईसीजी, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकर, स्त्रीरोग, त्वचारोग निदान व मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ११० जणांची तपासणी करण्यात आली. श्री आँल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी, पुष्कर जैन युवक मंडळ व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यांच्या वतीने लोणावळ्यातील जैन मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मावळ वार्ता फाउंडेशनच्या वतीने जागो हिंदुस्थानी ही शाळकरी मुले व नागरिकांचा समावेश असलेली रॅली मावळा पुतळा ते शिवाजी चौक दरम्यान आयोजित केली होती. शिवाजी चौकात देशभक्तीपर आधारित नृत्य स्पर्धा झाली.चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणदेहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपाध्यक्षा अ‍ॅड. अरुणा पिंजण, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, किसन नेटके, यदुनाथ डाखोरे, मदन सोनिगरा, अशोक शेलार, अली शेख, भाजप शहराध्यक्ष अ‍ॅड. कैलास पानसरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, मनसेचे अध्यक्ष विनोद भंडारी, महावीर बरलोटा, लायन्सचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, लहू शेलार आदी उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सीईओ सानप, उपाध्यक्षा पिंजण, सदस्य शेलार, नाईकनवरे, हाजीमलंग, खंडेलवाल यांच्या हस्ते सन्मानित केले. बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे यांना उपस्थित असतानाही बक्षीस वाटप करताना डावलल्याने चर्चेला उधाण आले होते. बाजारपेठेतील सुभाष चौकात व्यापारी नरेश गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जावेदभाई सिकीलकर होते. बोर्डाच्या उपाध्यक्षा अरुणा पिंजण, माजी उपाध्यक्ष मदन सोनिगरा आदी उपस्थित होते. चिंचोली येथील डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिक्षण समिती अध्यक्ष ललित बालघरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी कवायत, देशभक्तीवर आधारित स्फूर्तिगीते सादर केली. स्पर्धांमधील विजेत्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. वृक्ष संवर्धनाबद्दल सात विद्यार्थ्यांना वृक्षमित्र पुरस्कार देण्यात आले. तुकाराम जाधव, सचिन जाधव, सुरेश गायकवाड, देवराम भेगडे, बाळासाहेब जाधव, वसंत भेगडे, सुरेश बालघरे , संतोष भेगडे, सोपान पानसरे आदी उपस्थित होते. सकाळी साडेसहा वाजता चिंचोली गावातून विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत प्रभात फेरी काढली होती. विद्यार्थ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला. रमेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी मुख्याध्यापिका कविता भट यांनी स्वागत केले. (वार्ताहर)