शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पर्यटनातून गवसतेय हरवलेले गाव...!

By admin | Updated: May 16, 2016 01:17 IST

शहरातली लोक आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ग्रामीण भागांना भेटी देत आहेत

प्राची मानकर

पुणे : गाव हरवत चाललंय असं आपण म्हणतो; पण आज आवर्जून शहरातली लोक आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ग्रामीण भागांना भेटी देत आहेत, यामध्ये चूल म्हणजे काय, विहीर, शेतात पिकविल्या जाणाऱ्या भाज्या, पाटाचं पाणी, बैलगाडीत बसून ग्रामफेरी, शिवारफेरी, झुणका-भाकर, हुरडा अशी सगळी महाराष्ट्रीयन ओळख आज शहरी पर्यटक मोठ्या उत्साहाने आपल्या मुलांना करून देत आहेत, त्यामुळे हरवलेल गाव कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सापडायला मदत झाली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे, महाराष्ट्रातील पर्यटनाचा नवीन चेहरा म्हणून पुढे येणारे माध्यम म्हणजे कृषी पर्यटन आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकसुद्धा कृषी पर्यटनाला भेटी देत आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आज देशात कृषी पर्यटन व्यवसायात महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या मानाने नंबर एक स्थानावर आहे. शहरी पर्यटकांना गावाकडच्या मोकळ्या वातावरणाचा अनुभव घेता यावा, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घेता यावे आणि त्याचा आनंद उपभोगता यावा, याकरिता कृषी पर्यटन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्याप्रमाणात मदत करीत आहे.आज काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा रोजगार म्हणून स्वीकार केला आहे आणि त्यांना उत्पन्नही चांगल्या प्रमाणात मिळत आहे. कारण, ज्या शेतकऱ्याचे पर्यटन केंद्र आहे, अशा केंद्राला पर्यटक आवर्जून भेटी देतात, अशा वेळी शेतकरी त्यांची राहण्या-खाण्याची सोय करतो. त्यांना गावाची ओळख करून देतो, त्या गावात जर एखादे ऐतिहासिक ठिकाण असेल, तर त्यांची माहिती देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. काही पर्यटक जर गावात आले, तर १० किलो गहू घेऊन जातात यामुळे शेतकऱ्यांचा थेट माल विकला जातो. यामुळे शेतकऱ्यास जशास तसे पैसे मिळतात. काही हौशी शहरी भागातील पर्यटक शेतकऱ्याच्या पर्यटन केंद्राला आवर्जून भेट देतात. >कृषीक्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी संयुक्त राष्ट्र व्यवसाय परिषदेने २०११ मध्ये १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा करावा, अशी मान्यता दिली.महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केले आहे की, प्रत्येक शाळेतील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना किमान १ दिवसासाठी कृषी पर्यटन केंद्राला सहल म्हणून भेट देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मुलांना शेतीची माहिती मिळेल आणि ग्रामीण भागाचीदेखील ओळख होईल.२००४ मध्ये बारामतीमध्ये पहिले कृषी पर्यटन केंद्र स्थापन झाले आहे आणि त्यानंतर आज महाराष्ट्रातल्या ३३ जिल्ह्यांत कृषी पर्यटन केंद्राची स्थापना झाली आहे.१ एप्रिल २०१५ ते ३० मार्च २०१६ या एका आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या ३२२ कृषी पर्यटन केंद्राना ७ लाख ६८ हजार पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामधून या शेतकऱ्यांना १८ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न या पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. याचबरोबर शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला शेतीवर शाश्वत रोजगारही उपलब्ध झाला आहे.हल्लीच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतात पिकलेल्या मालाला योग्य किंमत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, पर्यायी काही शेतकऱ्यांना अपुऱ्या उत्पन्नाअभावी आत्महत्या कराव्या लागत आहे. यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा रोजगार म्हणून स्वीकार करावा. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास नक्कीच मदत होईल. - पांडुरंग तावरे, कृषी पर्यटन विकास संस्था विक्री व विपणनचे संचालक