शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेंगसरकर अ‍ॅकॅडमी ‘अ’ विजेता

By admin | Updated: May 9, 2017 03:44 IST

व्हेरॉक चषक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर अ‍ॅकॅडमी ‘अ’ संघाने पीवायसी संघाचा ७३ धावांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : व्हेरॉक चषक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर अ‍ॅकॅडमी ‘अ’ संघाने पीवायसी संघाचा ७३ धावांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले.थेरगाव येथील अ‍ॅकॅडमीच्या मैदानावरील अंतिम सामन्यात व्हेरॉक-वेंगसरकर अ‍ॅकॅदमीने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ४ बाद १७० धावा केल्या. त्यांच्या ओकार राजपूतने नाबाद ७९ धावा करीत धावसंख्येस आकार दिला. सामनावीर ठरलेल्या ओकांरला अथर्व देशपांडे (नाबाद ३३) आणि भार्गव महाजन (२८) यांनी उत्तम साथ दिली. पीवायसीचा डाव २२.१ षटकात ९७ धावांत आटोपला. त्यांच्या पुरब उपाध्यायने सर्वाधिक २० धावा केल्या. व्हेरॉकच्या प्रसन्न पवारने तीन तर साहील सावंत, ओम पोकळे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात पहिल्या उपांत्य सामन्यात पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी ‘अ’ संघाने आपल्याच ‘ब’ संघावर १०९ धावांनी सहज विजय मिळविला. ८७ धावा करणारा ओंकार राजपूत सामनावीर ठरला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पीवायसीने जसक्रिकेट अकॅडमीवर ९ गडी राखून विजय मिळविला. सुफीयानं सय्यद सामनावीर ठरला. मालिकावीर पुरस्कार ओंकार राजपुतने मिळविला. उत्कृष्ट फलंदाज प्रसन्ना पवार आणि उत्कृष्ट गोलंदाज अक्षत जैन ठरला. पारितोषिक वितरण कार्यकारी अभियंता (स्थापत्य) प्रदीप पुजारी आणि शशी काटे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष शशी काटे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.