शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘लग्नसराईला नोटाबंदीचे विघ्न’

By admin | Updated: December 24, 2016 00:27 IST

तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक,

कामशेत : तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक, साखरपुडा व लग्न असे विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईत कामशेत बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण शासनाने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाने लग्नकार्य असणारी कुटुंबे व त्याचबरोबर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. नोटबंदीच्या विळख्यात लग्नसराई अडकल्याने अनेकांची मोठी गोची झाली आहे. शासनाने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून ४५ दिवस पूर्ण झाले असून, या निर्णयाने अनेक ठिकाणी मोठे परिणाम झाले आहेत. सर्वत्र चलनटंचाई निर्माण होऊन मंदीचे सावट आले आहे. सगळीकडे व्यावहारिक परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून, अनेकांच्या घरामध्ये लग्नकार्य निघाले असल्याने या कार्यासाठी लागणारा पैसा बँकांमधील खात्यात असूनही काढता येत नसल्याने अनेक वधू-वर पित्याची मोठी गोची झाली आहे. शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध नाहीत. जेथे पैसे उपलब्ध आहेत तेथे भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. शिवाय एका आठवड्यात २४ हजार रुपयेच काढण्याची मुभा असल्याने लग्नकार्यात लागणारा लाखो रुपयांचा खर्च कसा भागवायचा हा यक्ष प्रश्न अनेकांना पडला आहे. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने वधू, वर पित्यांची रात्रीची झोप उडाली असल्याचे बोलले जाते. अनेकांनी आपल्या घरातील लग्नकार्ये उभे ढकलली आहेत. कार्यासाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांसाठी, तसेच पूजा व इतर धार्मिक विधीसाठी किराणा बाजार भरायचा आहे. पण, पुरेसे पैसे नसल्याने ओळखीच्या व्यापाऱ्यांकडे काही जणांनी उधारीवर बाजार भरला आहे. काहींनी बाजाराचे बिल चेकद्वारे दिले आहे. याशिवाय देवादिकांचे कार्यक्रम, लग्नाचा बस्ता, मानपानाचे कपडे, नवरा-नवरीसाठी सोन्याचे अलंकार खरेदी, घराची रंगरंगोटी, कार्यालयाचे बुकिंग, घरासमोरील मंडप व्यवस्था, फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग, वधू-वरांचे कपडे, लग्नाचे रुखवत, वरातीसाठी डीजे-बेंजो-रथ-बग्गी, फटाके व आतिषबाजी, केटरिंग, जागरण-गोंधळ, सत्यनारायण पूजा व देवदर्शन आदी नानाविध कार्यक्रमासाठी मोठ्या रकमेची गरज असताना हे पैसे आणायचे कोठून या विचारात वधू-वर पिता पडले आहेत. बँकांमधून पुरेसे पैसे मिळत नाहीत. एटीएम सुविधा विस्कळीत, सावकारी ठप्प, उसनवारीसाठी कोणी तयार नाही. या सर्वांमुळे लग्नकार्य निर्विघ्न कसे पार पडणार याची चिंता वधू-वर कुटुंबांना सतावत आहे. विवाह कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक ग्राहक ‘शेठ पैसे नाहीत, घरात कार्य आहे, बँकांचे व्यवहार सुरळीत झाल्यावर सर्व बिल चुकते करतो’ अशी आर्जव करीत असल्याने उधारीचे व्यवहार वाढले आहेत. (वार्ताहर)