शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

मावळात अवैध धंद्यांना ऊत

By admin | Updated: February 14, 2016 03:21 IST

मावळात जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये अफरातफर करून पैसे कमावणाऱ्याची संख्या वाढत आहे. हाच पैसा अवैद्य धंद्यासाठी उपयोगात

वडगाव मावळ : मावळात जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये अफरातफर करून पैसे कमावणाऱ्याची संख्या वाढत आहे. हाच पैसा अवैद्य धंद्यासाठी उपयोगात आणला जात आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे वाढत असल्याची चर्चा मावळ परिसरात आहे. मावळात पोलीस ठाण्याच्या प्रशस्त इमारती आहेत. काम करणारे अधिकारीही धडाकेबाज आहेत. तरीही परिसरातील अवैध धंदे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. मुबई -पुणे महामार्गावर रात्री साडेअकरानंतर सर्रास हॉटेल चालू असतात. त्यातील १० ते १५ टक्केच हॉटेलचे परवाने आहेत. इतर सर्व विनापरवाना हॉटेल पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. संबंधित हॉटेलमध्ये सर्रास खुलेआम दारूविक्री केली जाते. रात्री अनेक बेकायदा व्यवहारही या ठिकाणी चालविले जातात. महामार्गावरील ट्रकचालकांना लुटण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. मात्र, हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलली जाताना दिसत नाही. घरगुती भांडणे झाली, की खाकी वर्दीचा धाक पोलीस दाखवितात. मग, इतके अवैध धंदे चालू असताना पोलीस गप्प का? कारवाई का करत नाहीत? यामागे काही हितआर्थिक सबंध आहेत का? असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. वडगाव- तळेगाव हद्दीत तर भरदिवसा महामार्गावर वेश्याव्यवसाय चालतो. हा व्यवसायाला काही मंडळींचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. महामार्गावरील अनेक हॉटेलवर हा व्यवसाय चालतो. परंतु, पोलीस कारवाई करताना दिसत नाही. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदी असलेल्या गुटखा आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या पान मसाल्याची विक्री अगदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरात होते. (वार्ताहर)पवनानगरमध्ये खुलेआम विक्रीग्रामीण परिसरात गावठी दारूची विक्री खुलेआम व जोरात सुरू आहे. गांजा, जुगार, मटका अड्डे चालू आहेत. पवनानगरमध्ये तर हे सगळे खुलेआम चालू असताना पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे मोर्वे येथील महिलांनीच पुढाकार घेऊन काही दारूचे अड्डे शुक्रवारी उद्ध्वस्त केले. जे काम पोलिसांचे आहे, ते काम नागरिकांना पुढे येऊन करावे लागत असल्याची परिस्थिती आहे.वडगावच्या हद्दीतील सर्व अवैध दारू विके्रत्यांवर वेळोवेळी कारवाई केली आहे. पुढेही असे काही निदर्शनात आल्यास लगेच कारवाई केली जाईल. महामार्गावरील हॉटेल्सवर बारकाईने लक्ष असून, अवैध धंदे दिसल्यास कारवाई करू. -विजय जाधव, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ