शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 23, 2025 21:24 IST

वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असूनदेखील सौम्य कलम का लावले, पोलिसांवर कारवाई व्हायला हवी.

पिंपरी : वाकड येथील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भेट दिली. 'वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी कामात कसूर केल्याचे दिसते. सौम्य कलम का लावले, असा प्रश्न खडसे यांनी व्यक्त केला. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे चाकणकर यांनी सांगितले.वैष्णवीच्या माहेरी वाकड येथील कस्पटे कुटुंबीयांना चाकणकर यांनी भेट दिली. सांत्वन केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या कस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. चाकणकर म्हणाल्या, 'आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कडक पावले उचलली जाणार आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही.' तर खडसे म्हणाल्या, वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या ही घटना अतिशय वाईट असून पोलिसांनी कामात कसूर केला आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असूनदेखील सौम्य कलम का लावले, पोलिसांवर कारवाई व्हायला हवी.' चाकणकर यांना विचारला जाबकस्पटे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाकणकर आल्या होत्या. यावेळी उपस्थित महिला आणि संघटनांकडून चाकणकर यांना जाब विचारण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आणि उपस्थितांमध्ये वाद रंगला. त्याचबरोबर चाकणकर यांना मराठा समाजाचे धनंजय जाधव व अश्विनी खाडे व इतरांनी जाब विचारला. 'महिला आयोगाने काय कारवाई केली, मीडियासमोर बोला. तुम्ही मयुरी जगताप आणि अश्विनी कस्पटे व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा, अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा', असे संघटनांकडून सुनावले.

चिल्लर कोण, चर्चा रंगलीसदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि पोलिसांची भूमिका याविषयी खडसे यांनी मत व्यक्त केले होते. त्याबाबत चाकणकर यांना विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'महिला आयोग काय काम करतो हे सांगण्याची गरज नाही. खडसे यांच्या सहायकाच्या तक्रारी आल्या आहेत. काही चिल्लर लोक टीका करीत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचे. ' चाकणकर नक्की कोणाला चिल्लर म्हणाल्या. याबाबत चर्चा रंगली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे