शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

वैष्णव विचार मंडळास प्रथम स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:45 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मायबोली शब्दोत्सव-२०१६’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मायबोली शब्दोत्सव-२०१६’ या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक भोसरीतील वैष्णव विचार मंडळाने पटकाविले. उद्घाटन शनिवारी क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती समीर मासूळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘फ’ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बोऱ्हाडे, नगरसेवक नितीन लांडगे, गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, शिक्षण मंडळ उपसभापती नाना शिवले, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त योगेश कडुसकर, प्रशासन अधिकारी विठ्ठल बेंडे आदी उपस्थित होते. भजन स्पर्धेत एकूण १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भोसरीतील वैष्णव विचार मंडळ प्रथम, दिवगंत नामदेव माने महिला भजनी मंडळ द्वितीय, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ज्ञानेश फाउंडेशन महिला भजनी मंडळ यांनी पटकाविले. उत्कृष्ट गायक गायत्री थोरबोल, उत्कृष्ट तबला वादक विजय धावडे, उत्कृष्ट पखवाजवादक सचिन खानेकर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक इंद्रायणी गडकर आणि उत्कृष्ट टाळवादक संगीता रणपिसे यांना सन्मानित करण्यात आले. एचए माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘सोहम् शोध स्वत:चा’ ही नाटिका सादर केली. विनोद सुतार आणि सहकारी यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. गोरक्ष लोखंडे यांनी ‘नटसम्राट’ या नाटकामधील संवादाचा नाट्य अभिनय सादर केला. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख अविनाश सांगोलेकर यांचे ‘मराठी भाषा विकास आणि संवर्धन’ या विषयावर व्याख्यान झाले. पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी असली, तरी मराठी भाषेवर प्रेम करणारी नगरी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी झालेल्या क विसंमेलनामध्ये शहरातील अनेक कवींनी भाग घेतला होता. गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, दत्ता हगवणे, अनघा पाठक, सुभाष चटणे, सुरेखा कुलकर्णी, मधुश्री ओव्हाळ, किशोर परदेशी या कवींनी कविता सादर केल्या. या कवींनी विशेषत: मराठी भाषा समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या विषयांकित कविता सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. प्रास्ताविक अरुण बोऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचलन रमेश भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)