शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:29 IST

पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. त्यासाठी ६ नोव्हेंबरपर्र्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत नागरिकांना त्या त्या क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्जाद्वारे कामे सुचविता येतील. आलेल्या योग्य सूचनांचा समावेश पुढील अर्थसंकल्पात केला जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद केली आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने २००७ - ०८ या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा या दृष्टीने नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम पालिकेकडून राबविला जात आहे.या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपापल्या परिसरातील एखादेकाम अर्थसंकल्पात सुचवता येते. त्यासाठी सुचविलेल्या कामाचा खर्च १० लाख रुपयांपर्यंत असावाएवढीच एकमेव अट महापालिकेने घातली आहे. कचरा पेटीचीव्यवस्था, पदपथ तयार करणे,रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृद्धांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिक सूचना करु शकतात. योग्य सूचनांचा समावेश पालिकेच्या अर्थसंकल्पात केला जातो.>क्षेत्रीय कार्यालयांना सूचनामहापालिकेने २०१८-१९ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. आगामी अर्थसंकल्पात समावेश करावयाच्या कामांची यादी तयार करण्याचे आदेश आठही क्षेत्रीय कार्यालयांना व मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. तसेच अर्थसंकल्पात कामे सुचविण्यासाठी पालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे.>६ नोव्हेंबरपर्यंत मुदतनागरिक सूचना अर्ज आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे अर्ज कार्यालयीन वेळेत नागरिकांना विनामूल्य मिळणार आहेत. नागरिकांनी सुचविलेल्या कामांची शहानिशा करून संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील. त्यानुसार, नागरिकांनी ६ नोव्हेंबरपर्र्यंत क्षेत्रीय कार्यालयात कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड