शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वैश्विक विद्यापीठ वेदांच्या अध्ययनाची ओळख बनेल : बापट

By admin | Updated: February 4, 2016 01:19 IST

आपला देश वेदांमुळे वैभवशाली तर देशाची संस्कृती व इतिहास हा संतांच्या अध्ययनामुळे तयार झाला आहे. देवले येथील वैश्विक विद्यापीठ या सर्वांची खरी ओळख करण्याचे काम करेल व जगाला मार्गदर्शक ठरेल.

लोणावळा : आपला देश वेदांमुळे वैभवशाली तर देशाची संस्कृती व इतिहास हा संतांच्या अध्ययनामुळे तयार झाला आहे. देवले येथील वैश्विक विद्यापीठ या सर्वांची खरी ओळख करण्याचे काम करेल व जगाला मार्गदर्शक ठरेल. जगाच्या नकाशात या विद्यापीठाचा व परिसराचा नावलौकिक होईल, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी देवले या ठिकाणी होणाऱ्या आदित्य प्रतिष्ठानच्या वैश्विक संत विद्यापीठाच्या भूमिपूजन व वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी व्यक्तकेले.महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विद्या विश्वपती व विद्यापीठाचे प्रवर्तक गुरुदेव शंकर अभ्यंकर, मिरजचे आमदार सुरेश खाडे, उद्योजक सुरेश हावरे, अपर्णा अभ्यंकर, आदित्य अभ्यंकर, देवलेच्या सरंपच वैशाली शिंदे, औंढोलीगावच्या सरंपच जागृती मांडेकर, राहुल आंबेकर, साईनाथ मांडेकर, रवींद्र शिंदे, योगेश लोहोर, प्रदीप आंबेकर यांच्यासह विद्यापीठाचे अनेक सदस्य व परिससरातील ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार खाडे यांनी देवले औंढोली रस्त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी मी व पालकमंत्री पाठपुरावा करून कटिबद्ध राहू, असे सांगितले. शिवशाहीर पुरंदरे, हावरे, अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले.शंकर अभ्यंकर यांनी प्रास्ताविक, तर आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)