शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कुदळवाडीत बेकायदा दुकाने

By admin | Updated: December 28, 2016 04:33 IST

चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत.

पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आगीला प्रतिबंधक कोणत्याही उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने त्याचा लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. कुदळवाडी हा परिसर महापालिका हद्दीत येत असून, या ठिकाणी भंगार मालासह इतरही दुकाने आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून जितके लक्ष द्यायला हवे, तितके दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. तसेच, या बेकायदेशीर दुकानांना काही राजकीय माननीयांचा आशीर्वाद असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. परिसरातील भंगार मालाची दुकाने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्यापैकी अनेक दुकानांना महापालिकेचा उद्योग व्यवसाय परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे ही दुकाने बेकायदेशीर ठरतात. संबंधित व्यवसायामधून प्रदूषण होत असल्यास त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असते. या परवानगीनंतर उद्योगधंद्यांची परवानगी दिली जाते. अनधिकृत व्यवसायांवर वेगवेगळ्या विभागांकडून एकत्रित कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. अगदी दाटीवाटीने ही दुकाने वसलेली असून, यातील अनेक दुकाने बेकायदेशीर आहेत. येथील दुकानांमध्ये ज्वलनशील पदार्थांचाही वापर केला जातो. यातून आगीच्या दुर्घटना घडतात. मात्र, दुर्घटना घडल्यानंतरच त्याकडे लक्ष जाते. आतापर्यंत कुदळवाडी परिसरात लागलेल्या एकूण आगीच्या घटनांंमध्ये भंगार मालाच्या दुकानांना लागलेल्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. दाटीवाटीने वसलेल्या या परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेही पुरेसे नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलाचे वाहनही ऐनवेळी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. या ठिकाणी लोकवस्ती वाढत असून, जागा अपुरी पडत आहे. केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या भागाकडे लक्ष दिले जाते. मागील महिन्यात चिखली येथे गॅस स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाला जीव गमवावा लागला, तर १९ डिसेंबरला लागलेल्या आगीत सुमारे १० ते १५ भंगार दुकाने खाक झाली. यासह वेळोवेळी लागलेल्या आगीत इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, एखाद्या दुर्घटनेनंतरच संबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधले जाते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)कुदळवाडी परिसरात एक हजार ५९८ दुकाने आहेत. ही दुकाने रहिवासी क्षेत्रात असल्याने परवानगी घेताना पर्यावरणासह सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. - योगेश कडूसकर, सहायक आयुक्त