शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे, शास्तीवरून धूळफेक

By admin | Updated: January 26, 2017 00:25 IST

शहरातील प्रमुख अनधिकृत बांधकामे नियमितीकरण आणि शास्तीमध्ये सवलतीच्या प्रश्नांवर धूळफेक करण्यात आली. पूर्वीच्या काँग्रेस आघाडीने

पिंपरी : शहरातील प्रमुख अनधिकृत बांधकामे नियमितीकरण आणि शास्तीमध्ये सवलतीच्या प्रश्नांवर धूळफेक करण्यात आली. पूर्वीच्या काँग्रेस आघाडीने आणि आता सत्तेत असलेल्या युती सरकारनेही या प्रश्नी पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेली दहा वर्षे या प्रश्नावर मतदारांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत. परंतु, केंद्रात व राज्यात सरकार बदल्यामुळे नागरिकांना आशा होती. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे दोन्ही प्रमुख प्रश्नांचे निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा अनधिकृत बांधकामे नियमितीकरण हा राहणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी, नदीपात्र, रेड झोन अशी विविध प्रकारची अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात आजवरच्या राज्य सरकारने केवळ आश्वासनेच दिली आहे. महापालिकेने २००९ मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेदरम्यान शहरात महापालिका क्षेत्रात ६५ हजार अनधिकृत बांधकामे आहेत. असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, एकूण चार लाख मिळकतींपैकी निम्म्या मिळकती अनधिकृत आहेत, असे आढळून आले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात यावीत, अशी मागणी वेळोवेळी केली आहे. या विषयी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली आहे. एक आॅगस्ट २००८नंतर विनापरवाना बांधकामांना शास्ती आकारण्याचे धोरण शासनाने आखले. त्यानुसार दुप्पट शास्ती वसूल करावी, असा आदेश महापालिकांना दिला होता. मात्र, महापालिकांनी एक पट शास्तीचा ठराव केला. त्यानंतर शासनाने पुन्हा आदेश दिल्यानंतर आता दुपटीने शास्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे मूळ कराच्या दुप्पट शास्तीची बिले आल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. शास्ती रद्दबाबतचेही आश्वासन भाजपा सरकाने पूर्ण केलेले नाही. त्यामुळे केवळ आश्वासनेच पिंपरी-चिंचवडकरांच्या पदरी पडली आहेत. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)