शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अनधिकृत बांधकामांची गय नाही

By admin | Updated: May 10, 2017 04:13 IST

शहरात यापुढे कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही. अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करणारच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहरात यापुढे कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही. अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करणारच आहे. कर्मचा-यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करावी. कारवाई करण्यास टाळाटाळ करणा-या कर्मचा-यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. शहरासह राज्यभरातील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्याचे नवे विधेयक विधिमंडळाने मंजूर केले आहे. मात्र, या निर्णयाचे पत्र महापालिकेला मिळाले नाही. त्या संदर्भात पुढील कार्यवाही सुरू आहे. त्याबाबत अद्याप महापालिका प्रशासनास कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत. सर्रासपणे सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयी आयुक्त हर्डीकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.ते म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याबाबत दक्षता घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिका कारवाई करणारच आहे. त्याच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी.’’