शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

टँकरच्या जोखडातून मुक्तझाले उंबरमाळ

By admin | Updated: June 12, 2017 01:10 IST

टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला पाठवायचा अन् मग टँकर मंजूर करून घेण्यासाठी तालुक्याला खेटे घालत बसायचे, ही वर्षानुवर्षे चालणारी परंपरा धरणग्रस्त असणाऱ्या उंबरमाळ या गावाने यंदा जिद्दीने खंडित केली आहे. उंबरमाळ भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील धरणग्रस्त गाव आहे. भोर तालुक्यापासून २६ किलोमीटर असणारे हे गाव वेळवंडी नदीच्या तीरावर वसलेल्या कांबरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मोडते. सुमारे दीडशेच्या आसपास गावची लोकसंख्या आहे. ब्रिटिशकाळात १९२८ च्या सुमारास वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या भाटघर धरणामुळे या खोऱ्यातील सुमारे चाळीस गावे बाधित झाली. धरणाच्या पाण्यात येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित बरीचशी शेती गेली. पण घरे मात्र पूर्णपणे वाचली. तत्कालीन कोणतीही नुकसानभरपाई न मिळालेली ही गावे स्वातंत्र्यानंतरही उपेक्षितच राहिली. खराब रस्ते, दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, रोजगाराचा अभाव या समस्यांना या गावांना आजही तोंड द्यावे लागते आहे. धरणाचा लांबवर शेपटासारखा पसरलेला विस्तीर्ण जलाशय हा पावसाळ्यात जरी पर्यटकांना खुणावत असला तरी अनेक गावांसाठी हे उन्हाळ्यातील पाणी मिळण्यासाठीचे एकमेव आशास्थान आहे.धरणातील पाणीसाठ्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर असणाऱ्या गावाला दरवर्षीच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत असे. जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे तर ती अधिकच तीव्र होत असे. सध्या गावात साधी विहीरही नाही. गावात असणारा छोटा झरा खोदून त्याचा २००४ मध्ये शासनाच्या शिवकालीन पाणीसाठवण योजनेअंतर्गत पाणीसाठा वाढविण्यात आला होता. त्यामुळे ते पाणी संक्रांतीपर्यंत पुरत असे, मग मात्र पाणीटंचाई भासायला सुरुवात होत असे. म्हणून मग शासनाकडे भरपूर पाठपुरावा करून गावात हातपंप बसवून घेतला. परंतु त्याचेही पाणी संक्रांतीच्या आसपास आटत असे. उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने तर थेट नदीतून म्हणजेच पाणीफुगवट्यातून पाणी आणावे लागत असे. उन्हाळ्यात पाणीपातळी जसजशी खोलावत जाते तसतसे हे अंतर अधिक वाढत जाते आणि परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. अशा परिस्थितीत गावातील महिला, मुले व वयोवृद्ध माणसे यांना पाणी आणणे हे दररोजचे जिकीरीचे काम होऊन बसते. उंचावर असणाऱ्या गावातून धरणातून हंडाभर पाणी भरून चढ चढून आणणे, अशी जीवघेणी कसरत महिलांना करावी लागे. टँकरचा प्रस्ताव तर गेली वीस वर्षे ग्रामस्थ शासनाकडे न कंटाळता देतायेत, पण तो प्रत्यक्ष मंजूर होऊन गावात येईपर्यंत मे महिना उजाडत असे. शिवाय टँकर गावात दररोज ठराविक वेळेला येईलच, याची कोणतीही शाश्वती नाही.भोर-वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील पाणीटंचाईसंदर्भात काम करणाऱ्या वेल्ह्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेपर्यंत या गावाची भीषण परिस्थिती स्थानिक कार्यकर्ते बापू जोरकर व सुनील जोरकर यांच्यामार्फत पोहोचली. याआधारे ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे यांनी गावात ग्रामस्थांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी हटविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी पोलीसपाटील दत्तात्रय खुळे यांच्या पुढाकाराने केला. त्यास उपसरपंच योगेश खुळे व शिक्षक गणेश खुळे यांची साथ लाभली. त्यापुढील बैठकीत धरणातील पाणीसाठ्यातून गावात नळ-पाणीपुरवठा योजना करण्याचे निश्चित ठरले. बैठकीत ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची लोकवर्गणी या कामासाठी जमा करण्याचे आश्वासन दिले व लगोलग मार्चमध्ये (२०१७) जमाही करून दिले. धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात आवश्यक त्या सरकारी परवानग्या व वीजजोडणीसाठी करावा लागणारा पाठपुरावा याची हमी ग्रामस्थांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यालयात येऊन दिली. यासाठी ग्रामसेवक महादेव सोनवणे यांनीही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य केले. प्रबोधिनीचे तंत्रज्ञ पंकज शिर्के यांनी नळ-पाणी योजनेचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार केले. यासाठी लागणारा निधी मोठा होता. परंतु केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीएसआरप्रमुख तुषार जुवेकर त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य मान्य करून ग्रामस्थांची चिंता दूर केली.खर्चाची जबाबदारी घेतली संस्थांनीया नळपाणी योजनेअंतर्गत ९ हजार लिटर क्षमतेची पाणी साठवणूक टाकी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आली. पाणी साठवणुकीसाठी फेरोसिमेंट टाकीच्या वापराचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग होता. सिमेंटचा मर्यादित वापर करून व लोकसहभागाच्या आधारे या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार मुंबईमधील जलवर्धिनी संस्थेतर्फे केला जातो. प्रबोधिनी कार्यकर्ते प्रदीप जाधव व सुनील जोरकर यांनी याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन उंबरमाळमधील ग्रामस्थांच्या मदतीने ही टाकी बांधली. यात ग्रामस्थांनी जाळीभोवती सिमेंट-वाळूचे मिश्रण लिंपण्याचे काम श्रमदानाने केले. टाकीच्या अंशत: खर्चाची जबाबदारी पुण्यातील सेवावर्धिनी या संस्थेने उचलली.