पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथील काळेवाडी पुलाजवळ रात्री दहाच्या सुमारास घडली.विमल चुन्नीलाल भालोडिया (वय ३३, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी पुलाजवळून दुचाकीस्वार जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या वेळी वाहनचालक अपघात ठिकाणी न थांबता पळून गेला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: March 21, 2017 05:18 IST