शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

गणेश नाणेकर खुनी हल्ला प्रकरणी दोन जणांना अटक

By admin | Updated: March 5, 2017 21:11 IST

मागील आठवड्यात झालेल्या नाणेकरवाडी येथील गणेश संभाजी नाणेकर उर्फ महाराज यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी

ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 5 - मागील आठवड्यात झालेल्या नाणेकरवाडी येथील गणेश संभाजी नाणेकर उर्फ महाराज यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी येथील दोन जणांना चाकण पोलिसांनी अटक केली असून गुन्हेगारी क्षेत्रातील अंतर्गत स्पर्धेतून वरचढ झालेल्या महाराज यांचा काटा काढण्याच्या हेतूने त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील गणेश संभाजी नाणेकर ( महाराज ) यांच्यावर मागील आठवड्यात २४ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास तलवार, चाकू व चॉपरने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्राणघातक हल्ल्यात जबर जखमी झालेल्या गणेश याच्यावर चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चाकण पोलिसांनी मौंटी उर्फ संकेत जगदीश नाणेकर ( वय १९ रा. नाणेकरवाडी, चाकण ) व भीम पालखी कुशवाह ( वय १९ रा .नाणेकरवाडी, चाकण  ) या दोन तरुणांना अटक केली असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेले तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून अनेक गंभीर गुन्ह्यात संशयित असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक ४ रोजी चाकण जवळील वाघे वस्ती व नाणेकरवाडी येथे सापळा लावून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भादवी कलम ३०७, ३४, आर्म ऍक्ट ४ ( २५) ( २७ ) वाढीव कलम १२० ( बी ) हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस हवालदार रमेश नाळे,  दत्तात्रय जाधव, एस. आर. जरे, अजय भापकर, अशोक साळुंके, हवालदार सातकर यांनी याचा छडा लावून तपास केला.