शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्रासाठी दोन तास विद्यार्थी ताटकळत, पालकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 02:54 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या वतीने ‘वाइल्ड लाइफ वीक’च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी झाले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या वतीने ‘वाइल्ड लाइफ वीक’च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी झाले. अधिका-यांच्या प्रमाणपत्रावरील सहीसाठी आणि प्रभागाध्यक्ष वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास ताटकळावे लागले. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली.चिंचवड येथील संभाजीनगरात महापालिकेचे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आहे. शहरपातळीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी आयोजित केले होते. या कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना महापालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाणार होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती. त्यामुळे बक्षीसपात्र विद्यार्थी व पालक वेळेवर हजर होते.काही लोकप्रतिनिधीही वेळेवर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र, कार्यक्रम काही सुरू होत नव्हता. या वेळी पालकांनी चौकशी केली असता, प्रभागाध्यक्षांना येण्यास वेळ आहे, ते आल्यावर कार्यक्रम सुरू केला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र,कारण दुसरेच होते. बक्षीसपात्र विद्यार्थी आले असले, तरी त्यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे कार्यक्रमस्थळी आली नव्हती. त्यामुळे कार्यक्रमास आलेल्यांना ताटकळत बसावे लागले.ऐनवेळी अधिकाºयांची सही करण्यासाठी लगबगमहापालिका भवनात तिसºया मजल्यावर अतिरिक्त आयुक्तांचे कार्यालय आहे. उद्यान विभाग त्यांच्या अखत्यारित येतो. चित्रकला स्पर्धेच्या प्रमाणपत्रावर अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरी होणार होती. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी बैठका उरकून दालनात आले, त्या वेळी त्यांच्या सहायकाने प्रमाणपत्रे सहीसाठी आणली व कार्यक्रमास तातडीने द्यायची आहेत, असे सांगितले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी सह्या करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे कार्यक्रम सुरू केला. साडेपाचला सर्व प्रमाणपत्रे सही करून कार्यक्रमस्थळी नेण्यात आली. प्रमाणपत्र आणि प्रभाग समितीचे अध्यक्ष वेळेवर आले नसल्याने विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत बसावे लागले. प्रमाणपत्रे आल्यानंतर प्रभागाध्यक्ष केशव घोळवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड