शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अठ्ठेचाळीस प्रभाग झाले स्वच्छ

By admin | Updated: December 30, 2016 04:36 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या टप्प्यात ६४ पैकी ४८ प्रभाग हगणदरीमुक्त केले आहेत. देशातील पहिल्या दहा स्वच्छ

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या टप्प्यात ६४ पैकी ४८ प्रभाग हगणदरीमुक्त केले आहेत. देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांत आपला क्रमांक कायम ठेवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात दिनांक ४ ते ६ सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख आणि सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २० जानेवारीपर्यंत हे सर्व्हेक्षण सुरू राहणार आहे. या संदर्भातील माहिती महापालिकेतील स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियोजनाची बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, संगणक विभागप्रमुख निळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या वतीने झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात पिंपरी-चिंचवड शहराने देशात नववा, तर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ अभियान २०१९ पर्यंत राबविण्यात येत आहे. यामध्ये देशातील प्रत्येक शहरातील कुटुंबाकडे वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतागृह, घन कचरा व्यवस्थापन, संकलन व वर्गीकरण आणि स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँडिंग याचा विचार केला जातो. दोन हजार गुण निश्चित केले आहेत. शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी व घनकचरा व्यवस्थापनासाठी व स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँडिंगसाठी प्रत्येकी पाच, कचरा संकलन व वाहतूकसाठी चाळीस, कचरा विल्हेवाट वीस, सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहासाठी पंधरा, तर घरगुती स्वच्छतागृहासाठी पंधरा असे मिळून शंभर गुण निश्चित केले आहेत. महापालिकेमार्फत डेटा संकलनासाठी तब्बल नऊशे गुण, तर थेट निरीक्षणमार्फत डेटा संकलनासाठी पाचशे गुण, नागरिकांचा अभिप्राय डेटा संकलनासाठी सहाशे असे मिळून असे दोन हजार गुण असणार आहेत. नागरिकांच्या सहभागासाठी टोल फ्री नंबर दिला आहे. गेल्या वर्षी नववा क्रमांक मिळवला होता. मात्र, त्या वेळी स्पर्धेत केवळ ७५ शहरे होती. या वेळी स्पर्धा वाढली असून, एकूण पाचशे शहरे स्पर्धेत उतरली आहे. (प्रतिनिधी)3000 स्वच्छतागृहांचे काम पूर्णपिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतागृह नसणाऱ्यांना शौचालय बांधून देण्यात येत आहे. त्यासाठी सोळा हजार रुपयांचे अनुदान असणार आहे. स्वच्छतागृहासाठी महापालिकेकडे सात हजार नागरिकांनी अर्ज केले. यामध्ये सव्वाचार हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता ३५१ कोटी ४०२ लाभार्थ्यांना दिला आहे. सुमारे साडेतीन हजार स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. 48 प्रभाग हगणदरीमुक्तमहापालिकेच्या जुन्या प्रभाग रचनेनुसार ६४ प्रभाग आहेत. यापैकी ४८ प्रभाग हे हगणदरीमुक्त झाले असून, उर्वरित मार्चअखेर हगणदरीमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस आहे. सीएसआर अंतर्गतही शहरात सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पाच कंपन्यांनी तयारी दाखविली आहे.