शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास पाणी वादात

By admin | Updated: May 5, 2016 04:26 IST

पिंपरी-चिंचवड शहरास २४ तास पाणीपुरवठा करण्याची २०७ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या निविदेच्या प्रक्रियेत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप नगरसेवक आणि

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरास २४ तास पाणीपुरवठा करण्याची २०७ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या निविदेच्या प्रक्रियेत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे, तर मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सदस्यांमध्येच या विषयावरून जुंपली होती. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निविदा प्रक्रियेबाबत सदस्य आणि पदाधिकारी यांच्यात एकमत होते की नाही, नवे आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेणार याबाबत चर्चा आहे.केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत शहरात २४ तास पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. शहराच्या अंतर्गत ४० टक्के भागात पाणीपुरवठा करण्याची योजना हाती घेतली आहे. त्या कामांसाठी १४३.१७ कोटी रकमेच्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. संबंधित रकमेत देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाचा समावेश नव्हता. तो खर्च समाविष्ट करून पाणीपुरवठ्याची कामाची निविदा महापालिकेने प्रकाशित केली होती. या संदर्भातील निविदा काही वर्तमानपत्रांतही प्रकाशित झाली होती. त्यानुसार विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर, एसपीएमएल इन्फ्रा प्रा लिमिटेड या दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. विश्वराजने या कामासाठी २०७ कोटी आणि एसपीएमएलने ३१६ कोटींची निविदा सादर केली होती. त्यापैकी कमी दराची निविदा म्हणून विश्वराज इन्फ्रास्टक्चरची निविदा स्वीकारण्यात आली. या संदर्भातील करारनामा करून घेण्यासंदर्भात आणि खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायीपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, त्यास स्थायी समिती सदस्यांनी विरोध दर्शविला. मुख्यमंत्र्यांनाही पत्रनिविदा प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ही प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली आहे.ठेकेदारांसाठी निविदानिविदाप्रक्रियेत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनावर केला आहे. त्यामुळे नवे आयुक्त दिनेश वाघमारे हे किंवा स्थायी समिती सभा यावर कोणता निर्णय घेतात, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे. प्रशासनाने ठरावीक ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून निविदा काढली, त्यात स्पर्धा झाली नाही, असाही आरोप झाला आहे.ग्लोबल टेंडरची मागणीनिविदा प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. चोविस तास पाणीपुरवठा योजनेच्या निविदाप्रक्रियेत अनेक संशयास्पद बाबी असून, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत झाले आहे. ग्लोबल टेंडर काढावे, स्पर्धा होऊनच हे काम देण्यात यावे अन्यथा याबाबत न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही वाघेरे म्हणाले. टक्केवारीचे राजकारणआॅनलाइन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. त्यात फक्त दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. मुदतीत जेवढ्या निविदा आल्या. त्यातून कमी दराची निविदा प्रशासनाने स्वीकारली. यात स्पर्धा झालेली नसल्याचा आरोप स्थायीतील सदस्य, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही केला आहे. ठेकेदार आणि प्रशासनातील टक्केवारीच्या राजकारणामुळे ही निविदा स्वीकारल्याचा आरोपही केला आहे. पुढील सभेपर्यंत विषय तहकूबआयुक्त उपस्थित न राहिल्याने स्थायी समितीची सभा झाली नाही, असे महापालिका वर्तुळात पसरविण्यात आले होते. मात्र, २४ तास पाणीपुरवठ्याच्या विषयावरून सभा तहकूब केल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले. हा विषय अभ्यासासाठी तहकूब केल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे.