शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

सामान्यांचे जीवन सुखी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By admin | Updated: March 29, 2016 03:35 IST

विद्यापीठांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारा आणि उद्योजक, तसेच ग्रामीण विकास डोळ्यांपुढे ठेवून करायला हवा. तसेच विद्यार्थ्यांची कल्पकता संशोधनात

आकुर्डी : विद्यापीठांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारा आणि उद्योजक, तसेच ग्रामीण विकास डोळ्यांपुढे ठेवून करायला हवा. तसेच विद्यार्थ्यांची कल्पकता संशोधनात उतरवून सामान्य माणसाचे जीवन सुखी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केले. आकुडीर्तील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित पिंपरी - चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या संगणक पदव्युत्तर पदवी परिषदेचे (सीपीजीकॉन २०१६) आयोजन करण्यात आले होते. या वेळी सीडॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. वाय. पी. नेरकर, ए. सी. एम. पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आरती दीक्षित, बोर्ड आॅफ स्टडीजच्या समन्वयक डॉ. वर्षा पाटील, संस्थेचे विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, अधिष्ठाता जे. एस. उमाळे, डॉ. के. राजेश्वरी, डॉ. ए. डी. ठाकरे, प्रा. संतोष सांबारे उपस्थित होते. डॉ. गाडे पुढे म्हणाले की, शिक्षण, संशोधन, पैसा, गुंतवणूक, मनुष्यबळ आणि गरज यांचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर करावेत. सामाजिक विकास हे शासनाचे धोरण आहे. अपेक्षित विकास अभियांत्रिकीतील तंत्रज्ञान आणि संशोधनाने होणार आहे. त्यासाठी प्राध्यापकांनी नवीन कल्पकता आणि नावीन्यता वापरून शिक्षणसंस्थांनी संशोधनपूरक वातावरण निर्माण करावे. देशाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीशी संबंधित आपले संशोधन असावे. या वेळी प्राचार्य फुलंबरकर म्हणाले की, संशोधकांनी समाजातील वंचित घटकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग हा समाजातील समस्या सोडविण्यासाठी होणे आवश्यक आहे. तसेच संशोधन हे मानवी जीवनाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी व्हावे. सीडॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य फुलंबरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सोनाली पाटील व प्रा. दीपा आबीन यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा ठाकरे यांनी आभार मानले.(वार्ताहर)