शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

विकासकामांचा होतोय नागरिकांना त्रास

By admin | Updated: March 1, 2016 00:57 IST

विकासकामांच्या माध्यमातून केली जाणारी कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. चिंचवडमधील दळवीनगर प्रभागातील इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन परिसरात भूमिगत

चिंचवड : विकासकामांच्या माध्यमातून केली जाणारी कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. चिंचवडमधील दळवीनगर प्रभागातील इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन परिसरात भूमिगत केबल व पादचारी मार्गाचे काम रखडले आहे. कामाचा राडारोडा व अर्धवट कामांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.परिसरात वारंवार कामे केली जातात. मात्र, या कामांचे नियोजन नसल्याने ती अर्धवट राहतात. गेल्या दीड महिन्यापासून इंदिरानगर, प्रेमलोक पार्क परिसरातील रस्ते भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले. मात्र, ते पूर्ववत करण्याचा विसर पालिका प्रशासनाला पडला आहे. या कामाचा राडारोडा त्रासदायक ठरत आहे. कित्येक वर्षांनंतर या भागातील रस्ते दुरुस्त करण्यात आले. मात्र, नुकतेच केलेले रस्ते केबलच्या कामासाठी पुन्हा खोदण्यात आले. प्रशासनाच्या या पद्धतीबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. प्रेमलोक पार्क, इंदिरानगर परिसरातील विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी कामे करण्यात आली. मात्र, यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने परिसरातील रहिवाशी संतप्त झाले आहेत. हाती घेतलेली कामे पूर्ण करावीत व अर्धवट असलेले पादचारी मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)