शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी परिसरात मद्यपींचा होतोय त्रास

By admin | Updated: April 29, 2017 04:05 IST

पुणे-नाशिक महामार्ग तसेच टेल्को रस्ता परिसरात रस्त्यालगतच जुगार आणि मद्यपींनी बस्तान बसवले असून, भरदिवसा

भोसरी : पुणे-नाशिक महामार्ग तसेच टेल्को रस्ता परिसरात रस्त्यालगतच जुगार आणि मद्यपींनी बस्तान बसवले असून, भरदिवसा ठिकठिकाणी जुगार खेळणारांची आकडेमोड चाललेली दिसून येते. तसेच भोसरी उड्डाण पुलाखाली महामार्गालगतची दारूची दुकाने बंद केली असली तरीही मद्यपींच्या पार्ट्या ठिकठिकाणी रंगू लागल्या असल्याचे दिसून येते. मुख्य रस्त्यालगतच अशा अवैध अडड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या जुगार अड्ड्याबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत की, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.राज्य व राष्ट्रीय महामार्गांलगतची सर्व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने भोसरी परिसरातीलही अनेक दुकाने बंद करण्याची वेळ हॉटेलचालकांवर आली आहे. पण ठिकठिकाणी छुप्या पद्धतीने दारूविक्री सुरू असल्याचे नागरिकांत चर्चा आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील परिसरात सर्रास मद्यपींचे घोळके ओपन बार पद्धतीने दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसून येतात. बऱ्याचदा मद्यपींमध्ये वादावादी होऊन हाणामारीचे प्रकारही याभागात घडले आहेत. सोमवारी याच भागात मोकळ्या मैदानात एका इसमाचा खून केल्याचे आढळून आले. अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा अवैध अड्ड्यांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भोसरी टेल्को रस्त्यालगत दोन्ही बाजूस पालिकेने लॉन गार्डन व वृक्षारोपण करून त्यांची जोपासना केली आहे़ त्यामुळे याच भागात लांडेवाडी येथील इलेक्ट्रॉनिक सदन शेजारील झाडाझुडपांमध्ये तसेच बालाजीनगरमध्ये नागरिकांचे अड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत. (वार्ताहर)