शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यासाठी मनस्ताप

By admin | Updated: November 16, 2015 01:54 IST

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून स्मशानदाखला मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही.

संजय माने, पिंपरी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून स्मशानदाखला मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही. स्मशानदाखला मिळविण्यासाठी मृत्यूचे कारण विशद करणारा दाखला (डार्इंग डिक्लरेशन) जोडावे लागते. मृत्यूचे कारण विशद करणाऱ्या दाखल्यातील नियमांमध्ये भिन्नता असते. जुन्या पद्धतीचा नको, दुसरा दाखला घेऊन या असे ऐनवेळी सांगितले जात असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांना रुग्णालय ते जन्म-मृत्यूनोंदणी कार्यालय असे हेलपाटे मारावे लागतात. कामकाजात सुसूत्रता नसल्याने नातवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जन्म-मृत्यूनोंदणी विभाग आहे. रुग्णाचा कोणत्याही रुग्णालयात मृत्यू झाला, तर तेथील डॉक्टरकडून मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा दाखला घेतला जातो. त्या दाखल्यात कोणत्या आजाराने रुग्णाचा मृत्यू झाला, हे नमूद असते. मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे हे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे फॉर्म ४ अ होय. डॉक्टरांनी त्यावर मृत्यूचे कारण लिहिल्यानंतर त्या अर्जावर खाली नातेवाइकांनी भरावयाची माहिती असते. त्यात जवळच्या नातेवाइकाचे नाव,पत्ता, वय, मृत व्यक्तीशी नाते असा तपशील असतो. त्याचबरोबर मृत व्यक्तीचे नेत्रदान करायचे की नाही, अशी नातेवाइकांची संमती घेणारा रकाना असतो. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या दाखल्याच्या आधारे स्मशानदाखला मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होत असते. परंतु शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये नेत्रदानाविषयी नातेवाइकांची संमती घेण्याचा रकाना नसतो. नेत्रदानासंबंधी काहीही न लिहिलेला मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा वैद्यकीय दाखला जन्म-मृत्यूनोंदणी कार्यालयात घेऊन गेल्यास हा दाखला जुना आहे, यामध्ये नेत्रदानाचा तपशील नाही, नव्या मसुद्यासह आलेला दाखला आणा, तरच स्मशानदाखला देता येईल, असे सांगितले जाते. नातेवाइकांना सुधारित दाखला मिळविण्यासाठी पुन्हा धावपळ करावी लागते.