पिंपरी : घराची तोडफोड करून घरातील साहित्याची लूट करून दरोडा टाकल्याची तक्रार माणिक पुनेबा पालके (वय ५८, रा़ महात्मा फुलेनगर, मोहननगर, चिंचवड) यांनी सहायक पोलीस आयुक्तालयाकडे केली आहे़ ही घटना रविवारी राहत्या ठिकाणी घडली़ पालके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक परिसरातील गुंड त्रास देत असल्याचा अर्ज त्यांनी पोलीस उपायुक्तालय, पिंपरी यांना वारंवार दिला आहे़ अर्जाची दखल घेण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी पालके यांनी केली आहे़ स्थानिक गुंडांमुळे अनेकांना त्रास होत आहे़ मात्र, त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कोणीही तयार होत नाही़ गुंडांची भीती आणि दरारा असल्यामुळे रहिवासी दहशतीखाली वावरत असल्याची माहिती त्यांनी दिली़ रविवारी घराची तोडफ ोड करून घरातील साहित्याची चोरी केली़ एकंदरीत हद्दीचा वाद सोडून पालके कुटुंबाच्या तक्रारीची एकदा तरी पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिकाला गुंडांचा होतोय त्रास
By admin | Updated: November 16, 2016 02:34 IST