शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खिळेमुक्तीसाठी सरसावले वृक्षप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:37 IST

जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे.

रावेत : जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे.त्यासाठी खिळेमुक्त झाडे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रविवारी (दि. ८) ७० झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. दोन किलो खिळे काढून झाडांना वेदनामुक्त करण्यात आले.शहरात खिळेमुक्त झाडे, ‘नेल फ्री ट्री, पेन फ्री ट्री’ या अभियानांतर्गत ‘मी पाणी अंघोळीची गोळी’ यांच्या वतीने निगडी प्राधिकरणातील भेळ चौक ते काचघर चौक मार्गावर असणाऱ्या झाडांचे जवळपास दोन किलो खिळे काढले. प्रत्येक मंगळवारी चालणाºया या अभियानाची प्रेरणा घेऊन कै़ तुकाराम प्रतिष्ठानने हाच उपक्रम रविवारीसुद्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘अंघोळीची गोळी’मार्फत हा उपक्रम राबवला जात आहे. संभाजीनगर येथील ३८ झाडांना खिळेमुक्त केले आणि झाडांच्या संवर्धनाची आणि संवेदनांची गुढी उभारली. झाडांचे आयुष्य वाढविण्याच्या उद्देशाने झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी ‘खिळेमुक्त झाडे’ असे या उपक्रमाचे नाव असून याद्वारे शहरातील झाडे खिळेमुक्त केली जाणार आहेत. झाडांना वेदनामुक्त करण्याचा छोटा पण एक प्रामाणिक प्रयत्न आंघोळीची गोळी ह्यूमन सोसायटी, तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र संघटना, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, यांचे ४० सभासद सहभागी झाले. त्यात दोन तास हा उपक्रम करण्यात आला. त्यात ३२ झाडे खिळेमुक्त करण्यात आले.महादेव पाटील, अनिल पालकर, अशोक तनपुरे, संदीप सकपाळ, लक्ष्मण शिंदे, नितीन मोरे, नकुल टळले, फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, अरुण पाटील, बंटी सकपाळ, स्वाती पालकर, उल्हास टाकले, सूर्यकांत मूथीयान, समाधान पाटील, विठ्ठल सहाणेयांनी सहभाग घेतला़ येथून पुढे शहरातील विविध ठिकाणी तुकाराम तनपुरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत खिळेमुक्त झाडे अभियान यांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे अशोक तनपुरे यांनी सांगितले.>महापालिका : उद्यान विभाग उदासीनशहरातील वृक्षांचे संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र महापालिकेचा उद्यान विभाग याबाबत उदासीन आहे. उद्यान विभागाचे अधीक्षक आणि अन्य अधिकारी यांचा वृक्ष संवर्धनात सक्रिय सहभाग दिसून येत नाही. केवळ कागदी घोडे नाचवून शहरात वृक्षारोपण केल्याचे सांगण्यात येते. दर वर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र त्यांच्या संवर्धनाचे काय, हा प्रश्न अनुत्तरीत असतो. झाडांवर खिळे ठोकून जाहिरातबाजी केली जात असतानाही उद्यान विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.सामान्यांच्या सहभागाची गरजवृक्षसंवर्धनाची जबाबदारी केवळ महापालिका प्रशासनाची नसून शहरवासीयांचीही आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील झाडांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे निगा राखणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनी स्वत: पुढाकार घेत झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन वृक्षपे्रमींकडून करण्यात येत आहे.कारवाईची मागणीशहरातील झाडांवर जाहिरात फलक लावण्यात येतात. त्यासाठी झाडांना खिळे ठोकून त्यांना वेदना पोहोचविण्यात येतात. या प्रकारामुळे शहराचे विद्रूपीकरणही होत आहे. त्यामुळे अशा जाहिराती करणाºया दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृक्षपे्रमींकडून होत आहे.