शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील 'वायसीएम' रुग्णालयात म्युकर मायकोसिसच्या ३१ रुग्णांवर उपचार सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 21:00 IST

म्युकर मायकोसिस हा कोरोना सारखा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णामुळे तो दुसऱ्याला होत नाही...

पिंपरी : वायसीएम रुग्णालयात आतापर्यँत म्युकरमायकोसिसचे ६४ दाखल होते. त्यापैकी दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत त्यातील ३१ रुग्ण हे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोना झालेल्या काही रुग्णांना म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. मागील काही दिवसात शहरात अचानक या आजाराचे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस हा नवीन आजार आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु म्युकरमायकोसिस हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना आता होत असला. तरी कोरोना पूर्वी या आजाराचे शहरात वर्षभरात अवघे  चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी ही माहिती दिली. 

डॉ. वाबळे म्हणाले की, ज्या आजारामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशांना हा आजार होतो. कोरोनापूर्वी एचआयव्ही, टीबी, अनियंत्रित मधुमेह अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून येत होती. 

अतिमात्रेची 'स्टिरॉइड्स' दीर्घकाळ घेणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होण, मधुमेह नियंत्रणात न राहणं  या  कारणांमुळे 'म्युकर' बुरशीचा संसर्ग होऊन, 'म्युकरमायकोसिस' होतो. कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचं प्रत्यारोपण झालेल्या; तसंच डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानं, 'म्युकर'चा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. कोरोना पूर्वी या आजाराच्या  रुग्णांचे प्रमाण हे खूपच कमी होते. कोरोना झाल्यावर रुग्णांवर उपचार करताना जी औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांना हा आजार होत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने बुरशी डोके वर काढते. शरीरातील कमकुवत झालेल्या भागाला बुरशी लागते. बुरशी तोंड, नाकातून शरीरात प्रवेश करते. शरीराचा कमकुवत भाग म्हणजे चेहरा असतो. नाकाच्या बाजुची पोकळी, डोळा कमकुवत असतो.  त्याच्यातून बुरशी शरीरात जाते. उपचाराचे काही साईट इफेक्टसही होत असतात. मधुमेह असेल तर साखरेचे प्रमाण जास्त झालेले असते. अशा ठिकाणी बुरशी लगेच पसरते. ---संसर्गजन्य आजार नाही....म्युकरमायकोसिस हा कोरोना सारखा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णामुळे तो दुसऱ्याला होत नाही. सध्या कोरोना  झालेल्या,  मधुमेह आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होत आहे. डोळे आणि  डोक्यात तीव्र वेदना होणे, डोळे लाल होणे, दातांमध्ये दुखणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ----रुग्णांसाठी कॉल सेंटर सुरू कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती घेण्यासाठी महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे. दोन दिवसात २३६९ जणांची फोन करून माहिती घेण्यात आली आहे. कोरोनातून  बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत का याची  माहिती कॉल सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMucormycosisम्युकोरमायकोसिसhospitalहॉस्पिटल