शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रान्सपोर्ट’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:59 IST

उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना

अनिल पवळ पिंपरी : उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे. गत एका महिन्यात सुमारे दीड हजार कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. या शहरात हजारो कंपन्यांमधून विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली जातात. ही उत्पादने विविध शहरांत, राज्याबाहेर पाठवायची असल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवसायातून सुमारे १० हजार कोटींची उलाढाल होत असते.एक जुलैपासून देशभरात वस्तू व सेवाकर लागू करण्यात आला. त्यात प्रथमच कापडावर जीएसटी लावण्यात आला. याशिवाय लोखंड, ब्रॅण्डेड धान्यासह इतरही वस्तूंवर कराच्या टक्केवारीत वाढ केली. त्यामुळे बहुतांश व्यापाºयांनी कोणताही नवीन माल खरेदी करण्याची घाई केली नाही. व्यापाºयांमध्ये अद्यापही या कराबद्दल संभ्रमाची स्थिती असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावली आहे. त्यामुळे बाजारात मालाची टंचाई जाणवू लागली असून, त्याचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना बसला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यांमध्ये मोठा व्यवसाय होतो. मात्र, व्यापारीच माल खरेदी करीत नसल्याने ट्रक व्यवसाय थंडावला आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत दीड हजार कोटींच्या व्यवसायाला ब्रेक लागला आहे. परिणामी, ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कामगार, चालक आणि वाहकांचे हात रिकामे आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसाय ७० टक्के प्रभावित झाल्याने शहरातील निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरी, भोसरी, संतनगर भागात ट्रकच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.शहरातील अनेक छोट्या कंपन्यांनी जीएसटीमुळे गेल्या काही महिन्यांपासूनच उत्पादनात घट केली होती. जुन्या मालाची विक्री करून नवा माल नव्या दराने विक्रीसाठी सर्व प्रतीक्षेत आहेत. डिस्ट्रिब्युटर बाजारात माल पाठवीत असला, तरी छोट्या व्यापाºयांनी अद्याप जीएसटीचा नंबर घेतलेला नाही. त्यांनी नवा माल खरेदी करणेच बंद केले आहे. कंपन्यांमधून निघालेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास २० दिवस लागतात. विस्कळीत झालेली साखळी पूर्वस्थितीत येण्यासाठी किमान महिना लागेल, असे व्यावसायिक म्हणतात.शहरात लहान व्यावसायिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या व्यवसायामुळे तीनचाकी, चारचाकी छोट्या मालवाहतूक करणाºया वाहनांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे काम उपलब्ध होते. मात्र, जीएसटीसाठी आवश्यक असणारी नोंदणी अद्याप छोट्या व्यावसायिकांनी केली नाही. त्यामुळे त्यांनाही वाहतुकीची कामे नाहीत. वाहनतळावर धंद्याअभावी वाहने उभी आहेत. रोजच्या व्यवसायावर रोजीरोटी चालते. एकाएकी कामच मंदावले आहे. त्यामुळे घर खर्च आणि गाडीचे हप्ते फेडायचे कसे, ही विवंचना वाहनचालकांना सतावत आहे.