पिंपरी : महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर वर्षानुवर्षे ठिय्या मांडलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ‘मे महिन्यात बदल्या होतील, असे संकेत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता होती. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी एकाच जागेवर वर्षानुवर्षे ठिय्या मांडून होते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सत्तारूढ पक्षनेते आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याच्या संबंधित किंवा त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनीही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘एकाच पदावर तीन वर्षे काम केल्यानंतर बदली करण्यात यावी, असा नियम आहे. त्यानुसार माहितीचे एकत्रीकरण करून बदल्यांची कार्यवाही सुरू आहे.’’ (प्रतिनिधी)
मे महिन्यात होणार अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: March 25, 2017 03:51 IST