शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 13:27 IST

आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच बदल्यांचे आदेश देत कृष्ण प्रकाश यांनी अशाप्रकारे प्रस्थापितांना झटका दिला आहे..

पिंपरी : शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिन्या भरातच आयुक्तालयांतर्गत ३९९ पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहायक फौजदारांचा त्यात समावेश आहे. वाहतूक शाखा, मुख्यालय ते विविध पोलीस ठाणे तसेच तपासी पथकातील पोलिसांच्या या बदल्या सोमवारी (दि. २८ ) उशिरा झाल्या. 

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांचा काही भाग एकत्र करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालय कार्यान्वित झाले. आयुक्तालय नवीन असल्याने अनेक पोलिसांनी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली. तर काही जणांनी आहे तेथेच ठाण मांडले. यात काही पोलीस प्रस्थापित असल्यासारखे होते. कृष्ण प्रकाश यांनी ५ सप्टेंबर रोजी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच बदल्यांचे आदेश देत अशा प्रस्थापितांना झटका दिला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बदल्या झालेल्यांमध्ये सहायक फौजदार १३ , पोलीस हवालदार १२२, पोलीस नाईक १५७, पोलीस शिपाई १०७ यांचा समावेश आहे.    

बदली झालेले सहायक फौजदारशिरीष कोंडाजी रसार (भोसरी ते पिंपरी पोलीस ठाणे), हनुमंत बबन आवटे (चिंचवड ते विशेष शाखा), अशोक ज्ञानेश्वर जाधव (पिंपरी ते नियंत्रण कक्ष), बाबासाहेब दादासाहेब केदार (भोसरी एमआयडीसी येथे सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), राजेंद्र बाबासाहेब पवार (भोसरी एमआयडीसी - सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), विष्णू शंकर माळी (भोसरी एमआयडीसी - सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), संजय नारायण भालेराव (सांगवी - सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), प्रकाश निवृत्ती नलगे (सांगवी – वाकड पोलीस ठाणे), नथुराम बबनराव शेवाळे (देहूरोड – सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), मनोज पांडुरंग बनसोडे (वाकड ते रावेत पोलीस चौकी), उत्तम नामदेव सांडभोर (वाहतूक शाखा ते निगडी पोलीस ठाणे), शाकीर गौसमोहद्दीन जिनेडी (मुख्यालय ते गुन्हे शाखा), चंद्रकांत सुलाभराव काटे (दिघी ते पिंपरी-चिंचवड अतिक्रमण निर्मूलन विभाग).

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्तTransferबदली