शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन अर्जासाठी प्रशिक्षण

By admin | Updated: January 26, 2017 00:22 IST

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू झाली आहे. मोरवाडीतील कार्यालयात संगणक बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू झाली आहे. मोरवाडीतील कार्यालयात संगणक बसविण्याचे काम सुरू झाले आहे. संगणक यंत्रणा सज्ज होताच २६ जानेवारीपासून उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरणे, प्रतिज्ञापत्र सादर करणे ही कामे आॅनलाइन करावी लागणार असल्याने पक्षातर्फे उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.मोरवाडी, पिंपरी येथे भाजपाचे संपर्क कार्यालय आहे. त्या ठिकाणी रामकृष्ण राणे, तसेच संजय परळीकर हे पदाधिकारी नियमितपणे निवडणुकीचे कामकाज पाहतात. रोज सकाळी कार्यालय उघडल्यानंतर परिचय पत्रके, तसेच पक्षाचा जाहीरनामा या विषयीची पत्रके कार्यकर्त्यांना वितरित करण्यासाठी बाजूला काढली जातात. पक्षाच्या नियोजन बैठक कोठे असतील, त्याबाबतची माहिती याच कार्यालयातून पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिली जाते. कार्यालयात प्रसिद्धिप्रमुख बाबू नायर हेसुद्धा येऊन जातात. बुधवारी ते कार्यालयात आले. निवडणुकीसाठी पक्षाचे बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन नायर यांची लगबग सुरू होती. उमेदवारांनासुद्धा निवडणुकीसाठी बँक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या. भाजपाचे निवडणूक कामकाज अन्य दोन ठिकाणांहून केले जात आहे. मात्र, महत्त्वाची कामे पक्ष कार्यालयातून केली जात आहेत. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगतापही दुपारी पक्ष कार्यालयात येऊन जातात. दिवसभराच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील कामाचे नियोजन सांगून निघून जातात. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे. पक्ष कार्यालयातच अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाबदारी चोख सांभाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारयादीच्या प्रभागनिहाय प्रती तयार केल्या जात आहेत. त्या त्या प्रभागातील कार्यकर्त्यांकडे यादीच्या प्रती दिल्या असून, मतदारांशी संपर्कात राहण्याचे नियोजन केले आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर पक्षाच्या घडामोडी शेअर करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करून वेळोवेळी माहिती पाठवली जात आहे. (प्रतिनिधी)