- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पायावर पाय पडल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने रेल्वे प्रवशाला बेदम मारहाण केली. यामध्ये प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकावर घडली. पुण्याहून लोणावळ्याला ८.१० सुटलेली लोकल कासारवाडी येथे आली असता एम दाम्पत्य लोकलमध्ये बसले. या वेळी पायावर पाय पडल्याच्या कारणावरून दाम्पत्य व एका तरुणामध्ये वादावादी झाली. या वादावादीनंतर संबंधित तरुणाने फोन करून त्याच्या इतर साथीदारांना देहूरोड रेल्वे स्थानकावर बोलविले. नऊच्या सुमारास लोकल देहूरोड स्थानकावर आली असता चार जणांच्या टोळक्याने संबंधित गृहस्थाला लाथाबुक्याने तसेच उसाने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेवेळी रेल्वेस्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने काहीवेळ लोकल स्थानकावरच थांबविण्यात आली होती. - हुल्लडबाज तरुणांकडून अनेकदा लोकलमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. किरकोळ कारणावरून अरेरावीची भाषा करीत मारहाण करण्यापर्यंत हुल्लडबाजांची मजल जात आहे. यामुळे सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली प्रवास करीत असतो. अशा हुल्लडबाजांवर योग्य कारवाईची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रेल्वे प्रवाशाला देहूरोडमध्ये मारहाण
By admin | Updated: May 18, 2017 05:51 IST