शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीने वाढले अपघात

By admin | Updated: September 4, 2015 02:10 IST

टप्प्याटप्प्याने सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम व पुण्याच्या दिशेने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. आळंदी शहराजवळचे बाह्यवळणाचे रस्ते सुरू न होता

अंगद राठोडकर, दिघी टप्प्याटप्प्याने सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम व पुण्याच्या दिशेने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. आळंदी शहराजवळचे बाह्यवळणाचे रस्ते सुरू न होता तसेच प्रलंबित राहिल्याने पुणे - आळंदी रस्त्यावर नित्याची होणारी वाहतूककोंडी ही वाहनचालक व नागरिकांना त्रासदायक आणि जीवघेणी ठरत आहे. या बाह्यवळण रस्त्याची भूसंपादन प्रक्रियाच रखडल्यामुळे हे रस्ते होणार कधी, हा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. आळंदी शहराकडे वाहनांची वर्दळ नेहमीचीच आहे. शहराकडे जाण्यासाठी पुणे-आळंदी हा एकच मार्ग वाहतुकीसाठी वापरात आहे. आळंदीकडे जाण्यासाठी बाह्यवळण रस्ते हा पर्याय शिल्लक असला, तरी आळंदी नगरपालिकेची उदासीनता, नागरिकांचे असहकार्य यांमुळे येथील भूसंपादन प्रक्रियाच रखडली आहे. बाह्यवळण रस्ते उपलब्ध नसल्यामुळे पुणे-आळंदी या एकाच रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडतो. त्यात पुन्हा आळंदी शहरातील रस्तेही कमालीचे अरुंद आहेत. त्यामुळे आळंदी शहरात झालेल्या वाहतूककोंडीचा ताण हा थेट पुणे-आळंदी रस्त्यापर्यंत पोहोचतो. ही वाहतूककोंडी पुणे -आळंदी रस्त्यावर प्रभाव पाडत असल्याने तासन्तास कोंडी होताना दिसते.