शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोबाग शेतातच टाकली उपटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:58 IST

चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले.

पिंपरी पेंढार : चालू वर्षातील उन्हाळी हंगामात मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध असल्याने व गतवर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने याही वर्षी जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लखपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून टोमॅटो पीक घेतले. मात्र, बाजारभाव व मालाला उठाव नसल्याने पीक शेतातच फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे टोमॅटो आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आशिया खंडातील नावाजलेली नारायणगाव येथिल टोमॅटोची बाजारपेठ. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात सुमारे १० ते १२ हजार एकरांवर टोमॅटोचीलागवड होत असते आणि परंतु मागील १० वर्षाच्या लागवडीच्या आकडेवारीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के लागवडी कमी आहेत. या परिसरात साधारणपणे फेब्रुवारीपासून टोमाटो लागवडीचा हंगाम सुरू होतो ते थेट पावसाळ्यापर्यंत. परंतु उन्हाळी हंगामाच्या लागवडी एप्रिलच्या तिसºया आठवड्यापर्यंत समाप्त होतात.खरा हंगाम सुरू होतो तो जूननंतर. मात्र काही शेतकºयांनी आघात लागवड करीत टोमॅटो पीक घेतले. मात्र बाजार भाव उठाव नसल्याने पीक फेकून देण्याची वेळ आली आहे.या पिकासाठी नांगरणी, बांधणी, खत भरणी, ड्रीप, मल्चिंग पसरविणे, रोप लागवड, विविध औषध फवारणी, ड्रीपमधून खत सोडणे, पाणी सोडणे, सुतळी, काठी, डांब, तार, हा सर्व खर्च एकरी कमीतकमी दीड लाख रुपयांपर्यंत होतो. टोमॅटो पीक कमी दिवसांत जास्त नफा देऊन जाणारे असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. अतिशय मेहनत करून शेतकºयांनी चांगले पीक तयार केले परंतु बाजारभाव दीर्घकाळ मंदीत आल्याने शेतकºयाच्या हातात एकहीरुपया पडत नाही. अशा या मंदीच्या लाटेमध्ये सापडलेल्या शेतकºयाने उभ्या पिकात नांगर घातला आहे. जनावरे सोडली आहेत.सतरा लाखरुपयांचा तोटाजुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सावळेराम नानाभाऊ कुटे यांनी टोमॅटोच्या अकरा एकर बागा काढून टाकल्या आहेत.टोमॅटोस प्रतिएकर दीड लाख रुपये खर्च याप्रमाणे सुमारे सतरा लाख रुपयांचा तोटा त्यांना या वेळी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.सद्यस्थितीत नारायणगावयेथील बाजारात आज ७० ते८० रुपये प्रति २० किलोला बाजारभाव मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १५००० ते १८००० क्रेट्स (२० किलो / क्रेट्स) टोमॅटो मार्केटमध्ये आवक झाली आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापारी अमित दांगट यांनी दिली.हरियाना, पंजाब, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या भागातून संपूर्ण देशात टोमॅटो पुरवठा होत असल्यामुळे आपल्या भागातील टोमाटोला मागणी नाही. यामुळे येथीळ व्यापाºयांना स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. येणाºया २० ते २५ दिवसांत परराज्यातील टोमॅटो उत्पादनात घट होण्याची स्थिती असल्यामुळे टोमाटोचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे आहेत.