शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या पाच सदस्यांची आज निवड; खासदार, आमदार समर्थकांमध्ये होणार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 02:51 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा एकूण पाच जागांची निवड मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा एकूण पाच जागांची निवड मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. यावर वर्णी लावण्यासाठी आमदार व खासदार समर्थकांमध्ये चुरस लागली आहे. जुन्या आणि नव्यांचा समन्वय साधला जाणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीत दर वर्षी सर्व नवीन सदस्यांना संधी देण्याचे धोरण सत्ताधारी भाजपाने अवलंबिले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाच सदस्यांचे राजीनामे घेतले होते. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य आहेत. यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्षांच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. समितीतील सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी असला, तरी सोळापैकी आठ सदस्य एक वषार्नंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपाचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड मागील सभेत झाली होती.नवीन सदस्य निवडसत्ताधारी भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे लकी ड्रॉमधून वाचले होते. मात्र, सर्वच सदस्य नवीन देण्याचे धोरण भाजपाने अवलंबिल्याने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. हे सर्व राजीनामे महापौरांनी मंजूर केले आहेत. रिक्त झाल्या आहेत. त्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. समितीत संधी मिळावी यासाठी नगरसेवकांनी खासदार अमर साबळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष जगताप, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्याकडे साकडे घातले आहे. गटांच्या ताकदीनुसार नेत्यांशी आज चर्चा झाली. नावेही निश्चित झाली आहेत.अपक्षांचा स्वतंत्र गटभाजपासोबतच अपक्षांचा स्वतंत्र गट आहे. गटनेते कैलास बारणे, झामाबाई बारणे, नवनाथ जगताप, साधना मळेकर आणि नीता पाडाळे यांचा समावेश आहे. पहिल्या वर्षात बारणे यांना संधी दिली होती. अपक्षांकडून झामाबाई बारणे, जगताप, मळेकर की पाडाळे यापैकी कोणाला संधी दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे भाजपाच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे देतील. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून नियुक्ती झाल्याची घोषणा केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड