शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशशुल्क वसुली आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:52 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गुरुवारपासून वाहन प्रवेशशुल्क वसुली सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर विविध कारणांनी गुरुवारी प्रवेशशुल्क वसुली सुरू होऊ शकली नाही.

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गुरुवारपासून वाहन प्रवेशशुल्क वसुली सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर विविध कारणांनी गुरुवारी प्रवेशशुल्क वसुली सुरू होऊ शकली नाही. ती आता शुक्रवारी (दि. ४) सुरू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी कॅन्टोन्मेंटच्या विशेष बैठकीत ठराव मंजूर झाला. मात्र, पावतीपुस्तकांची छपाई, कामगारांची जुळवाजुळव यात दोन दिवस गेल्याने येत्या शुक्रवारी वाहन प्रवेश शुल्क वसुली पाच ठिकाणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विकासनगर-किवळे रस्त्यावर प्रथमच वाहन प्रवेश शुल्क वसुली सुरू होणार आहे. बुधवारी व गुरुवारी सर्व नाक्यांवर साफसफाई, फर्निचर जमवाजमव, शुल्क आकारणीचे फलक लावण्यात येत होते.वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने बंद असलेली वाहन प्रवेशशुल्क वसुली पुन्हा आकारण्याचा ठराव मंजूर करून गुरुवारपासून (दि. ३) शुल्क वसुली करण्याचे जाहीर केले होते. मात्र महिनाभर बंद असल्याने नाक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढली होती. नाक्यांसाठी अधीक्षक, एक निरीक्षक, कारकून व शिक्षकांसह ठेकेदाराकडील १५ कामगार असे ३९ कर्मचारी नेमले आहेत. बुधवारी सकाळपासून नाक्यांच्या परिसरात साफसफाई व गवत काढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी प्रवेशशुल्क वसुलीचे नवे दर दर्शविणारे फलक नाक्याच्या परिसरात लावण्याची कर्मचाºयांची लगबग सुरू होती. विविध शुल्कांच्या पावत्या गुरुवारी छपाई करून मिळाल्या असून, कर्मचाºयांना लागणारे आवश्यक लेखन सामग्री, साहित्य, फर्निचर आदी पोहोच करण्यात येत होेते. मध्यरात्री बारानंतर शुक्रवारी नाक्यांवर शुल्क वसुली सुरू करण्याची तयारी व नियोजन पूर्ण करण्यात आल्याचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सांगितले. विकासनगर - किवळे रस्त्यावर शंकर मंदिरासमोर दीड वर्षांपूर्वी उभारलेल्या नाक्यावर प्रथमच वाहन प्रवेशशुल्क वसुली सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.