शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वेळ निघून गेली, आता लक्ष घालणे व्यर्थ

By admin | Updated: June 28, 2017 04:13 IST

महापालिका निवडणुकीच्या काळात नगरसेवक, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर होते, त्या वेळी लक्ष घालण्याची विनंती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका निवडणुकीच्या काळात नगरसेवक, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर होते, त्या वेळी लक्ष घालण्याची विनंती केली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास वेळ नव्हता. त्यांनी जातीने लक्ष घालावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्या वेळी त्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी महापालिकेतील १५ वर्षांची सत्ता गमावण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली. भाजपाने सत्ता काबीज केली. सर्व काही हातचे निसटल्यानंतर आता लक्ष घालून, कार्यकर्त्यांशी संपर्क साधून साध्य काय करणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्तेच उपस्थित करू लागले आहेत.फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाने दारून पराभव केला. अवघे ३ नगरसेवक असलेल्या भाजपाने पिंपरी चिंचवड महापालिकेत ७६ नगरसेवक निवडून आणले. निवडणुकीला पाच महिन्याचा अवधी लोटला. आत्मचिंतनासाठी तरी एखादी बैठक घेणे अपेक्षित असताना, कोणीही नेते फिरकले नाहीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अजित पवार हे दोघे येत्या ३० जूनपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सभा, बैठका घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. सहा जुलैला शहरात बैठक होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागल्याने कार्यकर्ते मनातील खदखद व्यक्त करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांना प्रवेश देऊन भाजपाने राष्ट्रवादी खिळखिळी केली. राष्ट्रवादीतील तुल्यबळ उमेदवार घेऊनच भाजपाने महापालिकेत सत्ता काबीज केली. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी कोणी फिरकले नाही. निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याच कधी प्रयत्न केला नाही. एकहाती सत्ता काबीज केलेल्या भाजपाने महापालिकेत त्यांच्या मर्जीचा कारभार सुरू केला आहे. विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवकांना विरोधी पक्ष म्हणूनही ठोस कामगिरी दाखविता येत नाही, खंबीरपणे पाठबळ देणारे कोणी नसल्याने त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांचे मनोधैर्य खचल्याची स्थिती निर्माण झाली आहे.