शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या कारखान्यांची गळचेपी

By admin | Updated: September 7, 2015 04:19 IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मदन देवकाते यांना न घेतल्यास कारखान्याला बॅँकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही

बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मदन देवकाते यांना न घेतल्यास कारखान्याला बॅँकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही, असा दमच आमदार अजित पवार यांनी दिला. जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या ताब्यातील कारखान्यांची गळचेपीच केली जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बारामती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी या प्रकारचे वक्तव्य केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या; पण जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून माळेगाव कारखान्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी मेळाव्यानंतर खासगीत दिली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली. या कारखान्यावर चंद्रराव तावरे गटाचे वर्चस्व आहे. माळेगाव कारखाना सध्या सुस्थितीमध्ये आहे. हंगाम सुरू करण्याच्या दिशेने कारखान्याचे नियोजन सध्या सुरू आहे. असे असताना सत्ता गेली तरी जुनेच राजकारण अजित पवार करताना दिसत आहेत. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मदन देवकाते यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना जिल्हा बॅँकेचे संचालक म्हणून निवडून आणले. आता बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून देवकाते यांचीच माळेगाव कारखान्यावर नियुक्ती करावी, असा आग्रह अजित पवार यांचा आहे. वास्तविक ७६व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा बँकेच्या प्रतिनिधीची कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड करणे नियमबाह्य आहे. तरीदेखील केवळ विरोधकांचा कारखाना म्हणून अजित पवार राजकारण करीत आहेत काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सहकारी बॅँक, जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून विरोधकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न यापूर्वीदेखील झालेला आहे. माळेगाव कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. जिल्हा बॅँकेचे नियमित कर्ज फेडणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले जाते. (वार्ताहर)