शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात महिलेसह तीन जखमी

By admin | Updated: September 4, 2015 01:58 IST

भरधाव आलेल्या एसटीने दोन कारना धडक दिल्याने एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. धडक दिल्यानंतर एसटी पुलाच्या कठड्याचा अडथळा आल्याने थांबली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

लोणी काळभोर : भरधाव आलेल्या एसटीने दोन कारना धडक दिल्याने एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. धडक दिल्यानंतर एसटी पुलाच्या कठड्याचा अडथळा आल्याने थांबली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दोन सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर फाटा येथे झाला. यामध्ये आय-२० कारचालक अमोल नागेश कुंजीर (वय २८ वर्षे, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले असून, एसटी कंडक्टर उत्रेश्वर मछिंद्र मांजरे (वय ५४ वर्षे, रा. देगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) व चिरफडी, ता. बार्शी येथील आपल्या नातीस भेटून घरी परतत असलेल्या महिला प्रवासी शारदा बळीराम गलांडे (वय ५५ वर्षे, रा. पर्वती पायथा, पुणे) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी अमोल कुंजीर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे लोणी स्टेशन परिसरांत खोलेवस्ती येथे एक केक शॉपी असून, नेहमीच्या वेळेस दुकान बंद करून ते आपल्या कारमधून घरी निघाले होते. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ते पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी फाटा येथे आले. त्या वेळी लोणी काळभोर गावाकडे जाण्यासाठी स्वीफ्ट कार थांबली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला. त्याच वेळी बार्शी येथून बोरीवली येथे निघालेली एसटी वेगाने आली व तिने वळण्यासाठी थांबलेल्या स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व एसटी रस्तादुभाजकावर चढली आणि आय-२० कारला धडकली. त्यानंतर सुमारे शंभर फूट पुढे जाऊन पुलाच्या कठड्याला धडकून जागीच थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एसटी पुलावरून खाली पडली असती, तर बारा प्रवाशांसमवेत वाहक व चालक यांचा जीव धोक्यात आला असता. (वार्ताहर)