शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींची तीन वाहने

By admin | Updated: January 9, 2017 03:07 IST

आरोप-प्रत्यारोप होत असताना महापालिकेतील स्थायी समिती टक्केवारीतच गुंतल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या

पिंपरी : आरोप-प्रत्यारोप होत असताना महापालिकेतील स्थायी समिती टक्केवारीतच गुंतल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत १३ कोटींहून अधिक रकमेच्या वाढीव खर्चास मान्यता दिली. पाच कोटी रुपये खर्चून तीन वाहने खरेदी करावीत, असा विषय स्थायी समितीने मंजूर केला आहे. डांगे चौक ते वाकड भुयारी मार्गापर्यंतच्या ४५ मीटर रुंद रस्त्याचे आणि वाकड भुयारी मार्ग ते महापालिका हद्दीपर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांची मूळ निविदा अनुक्रमे २३ कोटी २७ लाख आणि २३ कोटी १४ लाख आहे. त्यांचा निविदा दर २९.९९ टक्के आणि ३०.८७ टक्के कमी आहे. त्यानुसार डांगे चौक ते वाकड भुयारी मार्गापर्यंतच्या कामासाठी १६ कोटी २९ लाख खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तर वाकड भुयारी मार्ग ते महापालिका हद्दीपर्यंतच्या १६ कोटी ८० लाख खर्चास ११ फेब्रुवारी १६ रोजी मान्यता दिली आहे. डांगे चौक ते वाकड भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यालगतचे जोड रस्ते, तसेच देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गालगतच्या या रस्त्याला जोडणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच वाकड भुयारी मार्ग ते महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्यालगत हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा जोड रस्ताही खराब झाला आहे. डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाताना वाकडगावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी, तसेच हिंजवडी व मारुंजी या रस्त्याजवळ वाहतुकीची कोंडी होते. या दोन्ही रस्त्यांच्या मूळ निविदा रकमेप्रमाणे अतिरिक्त पोहोच रस्त्याचे काम करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली आहे. (प्रतिनिधी)