शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सुविधा केंद्राचे तीनतेरा, शहरातील ५३ महासेवा पडल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 05:13 IST

महापालिका हद्दीत विविध ठिकाणी महापालिकेने करारनामे करून ५३ खासगी नागरी सुविधा केंदे्र सुरू केली आहेत. शासनाच्या महा-ई- सेवांतर्गतची कामे करण्याची मुभा या केंद्रांना दिली जाणार असल्याचे करारनाम्यात नमूद केले.

पिंपरी : महापालिका हद्दीत विविध ठिकाणी महापालिकेने करारनामे करून ५३ खासगी नागरी सुविधा केंदे्र सुरू केली आहेत. शासनाच्या महा-ई- सेवांतर्गतची कामे करण्याची मुभा या केंद्रांना दिली जाणार असल्याचे करारनाम्यात नमूद केले. मात्र, चार वर्षांत त्यांना शासनाच्या महा-ई-सेवांतर्गतची कामे मिळू शकली नाहीत. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रे ओस पडू लागली आहे.महापालिकेने खराळवाडी, पिंपरी येथे कामगारनेते नारायण मेघाजी लोंखडे भवनासमोर नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे. तसेच शहराच्या विविध भागांत क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत नागरिकांना महापालिकेशी कामे त्या त्या ठिकाणी करता यावीत, या करिता नागरी सुविधा केंद्र सुरू केली आहेत. महापालिकेत येऊन कामासंबंधी विचारणा करणाºयांना जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जाण्याचा सल्ला अधिकारी देतात.नागरिक ज्या भागात वास्तव्यास आहेत. त्या भागातील नागरी सुविधा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जात नाही. ज्यांनी महापालिकेशी करारनामा करून विविध ठिकाणी नागरी सुविधा केंद्र सुरू केली आहेत. त्याची नागरिकांना माहिती नाही.नळजोड मिळण्याचा अर्ज असेल, मिळकत कर, पाणीपट्टी भरणा, विवाह नोंदणीचे अर्ज स्वीकारणे, घरबांधणीसाठी परवानगी मिळविण्यासाठीचा अर्ज, अशी कामे या केंद्रांवर केली जातात. ही नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी संबंधितांनी भाडेपट्ट्याने जागा घेतली आहे. संगणक आॅपरेटरची नेमणूक केली आहे. इंटरनेट कनेक्शन घेतलेले आहे.महापालिकेसंबंधीची कामे करण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या नगण्य आहे. एका अर्जासाठी महापालिकेकडून केवळ १५ रुपये मिळतात. कार्यालयाचे भाडे, वीजबिल, इंटरनेट बिल, कामासाठी नेमलेली व्यक्ती हा खर्च विचारात घेता, ही केंद्र सुरू ठेवणे जिकिरीचे झाले आहे, अशी खंत नागरी सुविधा केंद्राचे संचाालक भारत शिवणकर यांनी व्यक्त केली आहे.सेवा कागदावरचशासनाने महा-ई-सेवा केंद्रांना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाशी संबंधित कामे करण्यास परवानगी दिली आहे़ ती कामे करण्याची मुभा महापालिका नागरी सुविधा केंद्रांनाही मिळाली, तर त्यांना पुरेसे काम मिळू शकेल. त्यांचा कामकाजासाठी लागणारा खर्च निघून त्यांनी थोडे तरी उत्पन्न मिळू शकेल, असा दावा केंद्र चालकांनी केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड