शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ नाही दुष्काळाचे भान

By admin | Updated: May 9, 2016 00:32 IST

राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. आता महापौरांसह १४ जण सिक्कीम दौरा करणार आहेत.

पिंपरी : राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. आता महापौरांसह १४ जण सिक्कीम दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी आठ लाख ६३ हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली करदात्यांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे. महापालिकेचे दौरे काही नवीन नाहीत. विविध कारणांनी दौरे काढून फिरायला जाण्यासाठी महिना, सहा महिन्यांनी दौरे आयोजित केले जात आहेत. मात्र, या दौऱ्याचा काय फायदा होतो, हे पदाधिकाऱ्यांनाच ठाऊक, अशी स्थिती आहे. फायदा होतो की नाही, हे निश्चित होत नसले, तरी दौऱ्यांवर लाखो रुपये खर्च होतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे. मात्र, याचे पदाधिकाऱ्यांना कसलेही देणे-घेणे नाही. महापालिकेच्या महापौरांसह जैवविविधता समिती, विधी समिती, स्थायी समितीमधील काही सदस्यांनी देशातील पहिले सेंद्रीय राज्य म्हणून घोषित झालेल्या सिक्कीम राज्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले आहे. दि. ८ ते १३ मे दरम्यान आयोजित दौऱ्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह जैवविविधता, विधी व स्थायी समितीतील काही सदस्य व अतिरिक्त आयुक्त, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता अशा एकूण १४ जणांचा दौऱ्यात समावेश आहे. पाणीटंचाई असताना पदाधिकाऱ्यांना दौरे सुचत आहेत. (प्रतिनिधी)