शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मातब्बर राजकीय घराण्यांतील लढत

By admin | Updated: February 15, 2017 02:03 IST

जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात सर्वसाधारण जागेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, भारतीय जनता पक्ष

तळेगाव दाभाडे : जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात सर्वसाधारण जागेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांत मुख्य लढत होत आहे. लक्षवेधी लढतीमुळे दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीप चंद्रकांत शिंदे यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. कॉँग्रेस पक्षाने या गटात उमेदवार उभा केलेला नाही. या गटात शिवसेना व कॉँग्रेस कोणती भूमिका घेते हेही महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीयदृष्ट्या दोन मातब्बर घराण्यातील या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. भाजपाने पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य नितीन मराठे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. रवींद्र किसन गायकवाड हे अपक्ष उमेदवार आहेत. शिंदे हे पंचायत समितीचे माजी सभापती असून, इंदोरी गावचे माजी सरपंच आहेत. यापूर्वी त्यांनी इंदोरी गणातून प्रतिनिधित्व केले आहे. मराठे हे वराळेगावचे माजी सरपंच आहेत. मिनी आमदारकी म्हणून या गटाकडे पाहिले जाते. इतिहास पाहता भाजपाला अनुकूल असलेला हा गट आहे. मागील तीन निवडणुकीत भाजपाच्या सुमित्रा जाधव, प्रशांत ढोरे व सविता गावडे यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. गटात भाजपाचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निवासस्थान येते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांचे निवासस्थान याच गटात आहे. भेगडे व दाभाडे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी लागणार आहे. सर्व साधारण जागेसाठी निवडणूक होत असल्याने गटात अजूनही अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोठा असून, प्रचारास कमी कालावधी असल्याने उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. दोन्ही उमेदवारांचा निवडणुकीत कस लागणार असून, गटातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. गटात उमेदवारांसह नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तळेगाव शहराला लागून असलेल्या तळेगाव ग्रामीणचा बराचसा भाग या वेळी नव्याने इंदोरी सोमाटणे गटामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. शिवसेना व कॉँग्रेसच्या मतांनाही महत्त्व येणार आहे. या गटात अर्थकारण महत्त्वाचे ठरणार आहे. इंदोरी-सोमाटणे या गटामध्ये इंदोरी, सुदवडी, माळवाडी, वराळे, तळेगाव ग्रामीण, सोमाटणे, ओझर्डे, आढे, बेबडओहळ, पिंपळखुटे, उर्से, परंदवडी, धामणे, गोडुंब्रे, शिरगाव, गहुंजे, शिवणे, सडवली या गावांचा समावेश होतो. मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव गट व गणाला देण्याच्या निकषाप्रमाणे इंदोरी-उर्से या गटाचे नाव बदलून ते इंदोरी - सोमाटणे असे झाले आहे. गटात अनेक अनेक औद्योगिक कारखाने आहेत. सोमाटणे फाटा परिसरात अनेक नामवंत हॉस्पिटल्स आहेत. मतदारात शेतकरी आणि कामगारांची संख्या अधिक आहे. (वार्ताहर)