शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोराच्या पिसाऱ्यातून साकारला अमृतमहोत्सवी तिरंग्याचा अविष्कार

By हणमंत पाटील | Updated: August 15, 2022 01:27 IST

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून तब्बल ७५ मोर तिरंगी पिसाऱ्याच्या नृत्याविष्कारातून साकारण्याचा संकल्प केला आहे.

हणमंत पाटील -

पिंपरी : एक दिवस, एक महिना नाही, तर तब्बल २० वर्षांपासून मनातील राष्ट्रीय पक्षी मोराचा चित्रकलेतून अविरत अविष्कार सुरू आहे. पुण्यातील न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा छंद मनापासून जपला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने या मोराने पुन्हा पिसारा फुलविला आहे. न्यायाधीश सुनील हे २० वर्षापूर्वी मित्राबरोबर बीड जिल्ह्यातील केज येथील शेतात फिरायला गेले होते. त्यावेळी शेतात पिसारा फुलवून नाचणारा राष्ट्रीय पक्षी मोर त्यांनी प्रत्यक्ष पहिला. अन् तेव्हा पासून या मोराने त्यांच्या मनात कायमचे घर केले. आपल्या देशातील कोणताही राष्ट्रीय सण असो वा समारंभ या निमित्ताने त्यांच्या मनातील हा मोर पिसारे फुलवून नाचू लागतो. त्याचा नृत्याविष्कार अपोआप कागदावर रेखाटला जातो. अमृत महोत्सवी तिरंगी मोरांची संकल्प... चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण व शिक्षण घेतलेले नाही. तरीही मनातील मोर रक्षाबंधनाला राखीच्या रुपाने, दिवाळीत दिव्याची आरास बनून, तर महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वजाच्या अविष्कारातून पिसारा फुलवू लागतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून तब्बल ७५ मोर तिरंगी पिसाऱ्याच्या नृत्याविष्कारातून साकारण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत ५० हून अधिक तिरंगी मोर त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर रेखाटले आहेत. 

 "भारतीय अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पक्षी मोराच्या प्रती असलेली मनातील भावना व आनंद चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे. आपल्या भारतीय राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने हा मोर माझ्या मनात पिसारा फुलवून नृत्याविष्कार करू लागतो. तोच कागदावर रेखाटण्याचा माझा प्रयत्न असतो."  - सुनील वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश क्रमांक ४, शिवाजीनगर, पुणे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन