शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोपखेलला उभारणार तात्पुरता उड्डाणपूल

By admin | Updated: May 26, 2017 06:15 IST

बोपखेलवासीयांचा प्रश्न सुटत नसल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासन,

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : बोपखेलवासीयांचा प्रश्न सुटत नसल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा प्रशासन, संरक्षण विभाग अशी तातडीची बैठक झाली. तात्पुरत्या स्वरूपातील पुलास मान्यता दिल्याचे पत्र महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. बोपखेल संघर्ष कृती समिती आणि ग्रामस्थांनी रस्त्यासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा पाचवा दिवस होता. यासाठी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनीही एकमताने लवकरच आयुक्तांची बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी मागणी महापौरांकडे केली होती. तसेच एक दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे महापौरांनी आज बैठक घेतली. या वेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, लष्काराचे राजेंद्र मुठे, आमदार गौतम चाबुकस्वार, सह शहर अभियंता राजन पाटील, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते. कायमस्वरूपी पूल होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातील पूल उभारण्यास अनुकूलता दर्शविली. त्यानंतर आयुक्तांनी लवकरच तात्पुरता पूल बांधू असे पत्र तयार करण्यात आले. त्यानंतर महापौरांनी सायंकाळी साडेसहाला हे पत्र आंदोलनकर्ते संतोष घुले यांना दिले. या वेळी पक्षनेते, सर्व विरोधी पक्षातील नेते यांच्यासह नगरसेविका माई घुले, निर्मला गायकवाड, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णुपंत नेवाळे, अमीत गावडे, श्याम लांडे, फजल शेख आदी उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बोपखेल गाव रस्ता संघर्ष समितीला पत्र दिले आहे. त्यातील मजकूर असा, बोपखेल पुलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात तात्पुरत्या पूल उभारण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे.