शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी सक्तीने शिक्षकवर्ग संतप्त

By admin | Updated: January 9, 2017 02:45 IST

शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवार, दि. ९ जानेवारीपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपद्वारे

वडगाव मावळ : शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवार, दि. ९ जानेवारीपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपद्वारे अपलोड करून सरकारला सादर करायचा आहे. कहर म्हणजे सेल्फी काढत असताना मोबाइलची जीपीएस सिस्टीम सुरू ठेवायची आहे. त्यामुळे फोटो कुठे काढला ते ठिकाण प्रशासनाला समजणार आहे.मावळ तालुक्यासारख्या दुर्गम भागात मोबाइलवर बोलायला रेंज नीट येत नाही, तर शाळांमधून ही जीपीएस सिस्टीम कशी चालणार, असा सवाल शिक्षकांमधून विचारला जात आहे. अगोदरपासूनच शालेय पोषण आहारासह इतर शैक्षणिक माहिती सरकार आॅनलाईनच मागवत आहे. त्यातच आता सोमवारपासून सेल्फी व पुढे हजेरीसुद्धा अशाच पद्धतीने आॅनलाइन भरावयाची आहे.शिक्षकांचा आता अधिकाधिक वेळ शिकवण्यात कमी व मोबाइलची रेंज शोधण्यात जात आहे. सरकार ही सर्व माहिती मोबाइल व इंटरनेटद्वारे मागवत असले, तरी सरकारने शिक्षकांना यासाठी कोणतीच साधने उपलब्ध करून दिली नाहीत. शिक्षकांनी स्वत:च्या पैशानेच नवा मोबाइल घ्यावा. स्वखर्चाने इंटरनेटचे रीचार्ज करावे. आम्ही फक्त वरून आलेल्या आदेशाचे पालन करत आहोत. तुम्हीही करा, असे अधिकारी वर्गाकडून सांगितले जात आहे. यामुळे शिक्षक वर्ग प्रचंड धास्तावला आहे. सामान्य शिक्षकांचा कोणीच वाली नाही, अशी चर्चा शिक्षकांमधून होत आहे. आम्ही शाळेत शिकवायचे का मोबाइलवर सगळी माहितीच भरत बसायचे, असे प्रश्न विचारले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना या विषयावर मात्र, या संदर्भात मूग गिळून गप्प आहेत. इतर काही जिल्ह्यांत मात्र या कामांवर संघटना माध्यमातून सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.(वार्ताहर)