शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्सच्या कामगारांना २९ हजार बोनस; कंपनी व्यवस्थापन व युनियनमध्ये करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 05:13 IST

टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता बोनस आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदानाबाबत मंगळवारी करार झाला.

पिंपरी : टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता बोनस आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदानाबाबत मंगळवारी करार झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना सुमारे २९ हजार रुपये दिवाळी बोनस आणि सानुग्रह रक्कम मिळणार आहे.करारावर व्यवस्थापनातर्फे अलोक सिंग (युनिट प्रमुख - पुणे वर्क्स), सरफाज मणेर (मनुष्यबळ विभागाचे - सीव्हीबीयू) व इतर व्यवस्थापन अधिकारी यांनी स्वाक्षरी केली. तर युनियनच्या वतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, सरचिटणीस उत्तम चौधरी, खजिनदार गणेश फलके, संयुक्त सचिव अबीदअली सय्यद, कार्यकारिणी सदस्य महेंद्र कदम, सुनील रसाळ, राम भगत, प्रतिनिधी विलास सपकाळ, विक्रम बालवडकर यांनी करारावर स्वाक्षरी केली.दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या करारामुळे कंपनीत उत्साहाचे वातावरण आहे. कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.- गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे उद्दिष्ट गाठत उत्पादन खर्चात कपात केली असून, कंपनीने ही रक्कम कामगारांसाठी बोनस जाहीर केली आहे. तसेच कंपनीच्या सुपरअ‍ॅन्युएशन योजनेत समाविष्ट असलेल्या कामगारांना ८ हजार ५५० रुपये ही अ‍ॅडहॉक रक्कम देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या वेळी कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बोरवणकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि उत्पादन खर्चात कपात यासाठी कामगारांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.