शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानात सहभाग घेत विकासासाठी पुढे या

By admin | Updated: January 23, 2017 02:59 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा व शहराच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन

पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा व शहराच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे सायकल डे निमित्त आयोजित केलेल्या सायकलिंग रॅलीचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विलासराव भोसले, सचिव कल्याणी कुलकर्णी, साहेबराव नाईक पवार, मेदनकर, तळेगाव विभागाचे विलास काळोखे, दादा हुरे, आकुर्डी विभागाचे विजय तारक, संतोष अगरवाल, भारत पेट्रोलियमचे विभागीय व्यवस्थापक पवनकुमार, उपअभियंता बापू गायकवाड, अनिल शिंदे, सुनील पवार, रोटरी क्लबचे पदाधिकारी आदींसह शहरातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘येत्या २१ फेब्रुवारी २०१७ रोजी महानगरपालिका निवडणूक होत आहे. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मतदान करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. महापालिकेमध्ये चांगले प्रतिनिधी निवडून दिल्यास शहराचा विकास होण्यास मदत होईल. याबाबत सर्वांनी सजग राहून महापालिकेस सहकार्य करावे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लबने सायकलिंग रॅली हा स्तुत्य उपक्रम राबवून चांगला संदेश दिला आहे.’’ सुमारे चार कि.मी. अंतराच्या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी आठला भक्ती-शक्ती चौकातून आयुक्त वाघमारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. सायकल डेच्या निमित्ताने रोटरी क्लबने लकी ड्रॉ पद्धतीने धवल देशमुख, सिद्धेश सुभेदार, गायत्री वाघोडे या तीन विद्यार्थ्यांना आयुक्त वाघमारे व क्लबचे अध्यक्ष भोसले यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या रॅलीमध्ये मतदार व मतदान जनजागृती पत्रके माहिती व जनसंपर्क कक्षाच्या वतीने वाटप करण्यात आली. क्लबचे अध्यक्ष भोसले यांनी प्रास्ताविक केले. सचिव कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)