शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ३५ झाडांची पद्धतशीर कत्तल

By admin | Updated: April 29, 2017 04:03 IST

रोप विके्रतेच झाडांचे भक्षक झाल्याचे चित्र परंदवडी-सोमाटणे रस्त्यावर पहावयास मिळते. गेल्या पाच वर्षांत येथील ३५ झाडांची

उर्से : रोप विके्रतेच झाडांचे भक्षक झाल्याचे चित्र परंदवडी-सोमाटणे रस्त्यावर पहावयास मिळते. गेल्या पाच वर्षांत येथील ३५ झाडांची अतिशय हुशारीने कत्तल करण्यात आली. दोन्ही बाजूंनी असणारी झाडांची संख्या खूपच कमी झाली आहे. झाडांच्या बुंध्याजवळच प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळल्या जात आहेत. वन विभागाने या ठिकाणी पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी आहे.झाडांचे संवर्धन करणे काळाची गरज असताना काही लोकांकडून नियम धाब्यावर बसून वक्षतोड केली जात आहे. यासाठी ना वन विभागाची परवानगी घेतली जाते, ना ग्रामपंचायतीची. सोमाटणे-परंदवडी हा रस्ता पवन मावळातील गावांना, जोडणारा मुख्य रस्ता आहे. पूर्वी रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची संख्या खूप होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत या भागात नागरिकरणाबरोबर वाहतूकही वाढली आहे. येथे नर्सरी उद्योगांची संख्याही वाढली. रस्त्याच्या दुतर्फा ४० ते ५० नर्सरी आहेत. सुुमारे तीन किलोमीटर रस्त्यालगत जवळपास ११० झाडे आहेत. पाच वर्षांपूर्वी सोमाटणे हद्दीतील नर्सरी व्यावसायिकांनी येथील झाडे आपल्या व्यवसायास अडचण होऊ नये म्हणून, अतिशय हुशारीने झाडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरूकेले. ते कोणाच्याही लक्षात आले नाही. नर्सरी व्यवसायातील वापरून झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मोठ्या झाडांच्या बुंध्यापाशी जाळून टाकल्या जात होत्या. पिशव्या जाळत असताना, झाडांचा बुंधा हळूहळू जळत होता. यामुळे काही दिवसांनी झाडांची पाने गळणे, झाड सुकण्याची प्रक्रिया सुुरू झाली. कालांतराने झाडाला कीड लागली, असेच जमीन मालकांसह कोणालाही वाटू शकते. त्याचा फायदा घेत नर्सरी व्यावसायिक झाड खराब झाल्याचे दाखवून सरपणासाठी उपयोग करून घेतात. गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने ३० ते ३५ झाडांची कत्तल झाली आहे. सध्या ७ ते ८ झाडे पूर्णपणे सुकलेली दिसत आहेत. ही झाडे कशामुळे सुकली आहेत? का सुकविली जात आहेत? हे कधी कोणी जाणून घेतले नाही. जमीन मालकानेही नाही. झाडे तोडणे हा गंभीर गुन्हा असतानाही शासनाच्या ताब्यातील रंग लावलेल्या झाडांचीही कत्तल करण्यात आली आहे. (वार्ताहर)