सुदुंबरे : सुदुंबरे व सुदवडी येथे श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर, तसेच रोकडोबामहाराज मंदिरामध्ये काकडारती उत्सव सुरू आहे. या काकडारतीला सुमारे ६० वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थ रोज न चुकता काकडारतीला पहाटे ४ ते ६ दरम्यान ईश्वरभक्तीत तल्लीन होत आहेत. त्यांच्या दिवसाची सुरुवात भक्तीमय वातावरणात होत आहे. काकडारतीला मंदिरापुढे रांगोळी काढली जाते. संपूर्ण महिन्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक दिवशी आरतीचा मान वेगवेळ्या कुटुंबीयांना दिला जातो. पूजेचा मान असणाऱ्या कुटुंबाला पूजेचे साहित्य, हार आदींची सोय करावी लागते. मूर्तीला अभिषेक करून महापूजा केली जाते. येथील काकडारतीसाठी ३० महिला व ४० पुरुष टाळकरी असतात. श्री संत तुकाराममहाराज यांची अंघोळ करण्याची शिळा आजही गावकऱ्यांनी या मंदिरामध्ये जतन केली आहे. या मंदिरामध्ये संत तुकाराममहाराजांची अनेक कीर्तने झाली आहेत. (वार्ताहर)
सुुदुंबरे, सुदवडीत काकडारतीचे सूर
By admin | Updated: November 11, 2015 01:20 IST