पिंपरी : प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे चिंचवड, महात्मा फुलेनगर येथील एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिने ५ मार्च रोजी विष प्राशन केले होते. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी विशाल विष्णू लष्करे (वय १९, रा. रामनगर, चिंचवड) या आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीचे वय १८ वर्षे आहे. या दोघांमध्ये सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने विशालकडे लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला. तसेच तिचा मानसिक छळ केला. त्यातून नैराश्य आल्यामुळे तरुणीने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
नैराश्यातून तरूणीची आत्महत्या
By admin | Updated: March 23, 2017 04:24 IST