शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अचानक आलेल्या पावसाने तारांबळ

By admin | Updated: July 27, 2016 04:02 IST

आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता उन्हाच्या झळा बसत होत्या. त्यानंतर काही वेळातच वातावरणात बदल होऊन

पिंपरी : आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता उन्हाच्या झळा बसत होत्या. त्यानंतर काही वेळातच वातावरणात बदल होऊन अचानक दुपारी दोनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी आल्या. तब्बल अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या संततधारेमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन दिवसांपासून उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या होत्या. मंगळवारी सकाळीदेखील आकाश निरभ्र होते. मात्र, दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरीतील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसाच्या धारा सुरू झाल्या. प्रत्येक जण परिसरातील दुकानांचा आसरा घेताना दिसून आले. काही वेळातच शहरातील सर्व रस्त्यांवरची गर्दी ओसरली होती. शहरातील पिंपरी, भोसरी, आकुर्डी, चिंचवड, निगडी, थेरगाव, वाकड, सांगवी या भागातील रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. अनेक जणांना पावसात भिजावे लागले. (प्रतिनिधी)